27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeSindhudurgसिंधुदुर्गात पूर्ण जिल्हाबंदी

सिंधुदुर्गात पूर्ण जिल्हाबंदी

महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना संक्रमितांचे प्रमाण आणि मृत्युदरा मध्येही घट झाली आहे. परंतु, शासनाने आखून दिलेली नियमावलीचे ग्रामीण भागामध्ये पालन केले जात नसल्याने बर्याच भागामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधदुर्ग जिल्हे प्रथम दर्शनीय आहेत. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन सारख्या विविध योजनांचे अवलंबन करून कोरोना संसर्गवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहे.

अगदी राज्य शासनानं जिल्हातील कोरोनाची स्थिती बघता प्रशासनाला त्यांच्या स्थानिक पातळीवर सुद्धा निर्णय़ घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ जून ते १५ जून पर्यंत पूर्ण जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमा असलेल्या आंबोली, बांदा, खारेपाटण, करूळ या भागातील अत्यावश्यक सेवा वगळता पर जिल्ह्यातील किंवा पर राज्यातील व्यक्तींना वाहतुकीसाठी प्रवेश निषिब्ध करण्यात आला आहे. १ जून ते १५ जूनपर्यंत जिल्हाबंदीचे कडक नियम सिंधुदुर्गमध्ये लागू केले जाणार आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश जारी केले असून,फक्त कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू, वैद्यकीय उपचार, अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठीची वाहतूक या कारणांसाठी प्रवास करण्याची सूट दिली गेली आहे. जीवनावश्यक माल वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले नसले तरीही दुकानांना वेळेची मर्यादा आखून दिलेली आहे. त्याचे जर उल्लंघंन झाल्यास त्यांच्यावर त्वरित दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जारी केले असून, जिल्ह्यातून कोरोनाची साथीच समूळ उच्चाटण होत नाही तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याची कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱी कार्यालयाकडून स्पष्टपणे जाहीर करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular