रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पोलीस स्टेशन अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने महत्वाची कागदपत्रे जाळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सगळीकडे वातावरणाचा सुरु असलेला लपंडाव पाहता कधी प्रचंड उष्मा तर कधी संपूर्ण मळब असते. त्यामुळे नक्की कशामुळे हि आग लागली हे प्रथम दर्शनी लक्षात आले नव्हते.
सकाळी ६ वाजता दापोली पोलिस स्टेशनला आग लागली. या संदर्भातील माहिती सर्वप्रथम अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या आगीत काय आणि किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या आगीचं कारण काही वेळानंतर कळले असून हि आग शॉक सर्किटमुळे लागल्याचे समजते आहे.
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, पोलीस स्टेशनमधले महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. आग लागल्यानंतर अनेक स्थानिक नागरिकांनीही मदत केली. त्यानंतर पोलीस स्टेशनमधून शस्त्रे, काही बंदुका आणि काही दस्तऐवज बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. आग आता आटोक्यात आली आहे. मात्र नक्की काय काय जाळून खाक झाले आहे त्याचा अजून अचूक अंदाज बांधता आलेला नाही.
परंतु अचानक लागलेल्या आगीने थोड्याच वेळात भयंकर रूप धरण केल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. शासकीय मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आगीचे वृत्त कळल्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर धाव घेतल्याने सुदैवाने मात्र जीवितहानी टळली आहे.