23.9 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraधान्यांचे वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, वितरण ट्रकना जीपीएस यंत्रणा

धान्यांचे वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, वितरण ट्रकना जीपीएस यंत्रणा

जिल्हा पुरवठा विभागाचे ४१ ट्रक आता ग्लोबल पोझिशन सिस्टीम म्हणजेच जीपीएस यंत्रणेवर आहेत.

रत्नागिरीमध्ये मागील दोन महिन्यांपासून धान्य साठा, धान्य पोती उतरवणारे हमालांची वाराई, धान्य वितरणामध्ये घडत असलेली अनियमितता आणि सध्या भेडसावत असलेली ऑनलाईन धान्य वितरणाची समस्या डोके वर काढत आहे. त्यामुळे एकूण या प्रकरणावर गंभीर विचार करून धान्याचे वितरण योग्य कालावधीमध्ये होणे गरजेचे आहे. शासन सुद्धा धान्य पुरवठा वेळेत होण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करत आहे.

जिल्ह्यातील धान्यांची वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हा पुरवठा विभागाचे ४१ ट्रक आता ग्लोबल पोझिशन सिस्टीम म्हणजेच जीपीएस यंत्रणेवर आहेत. ठरवून दिलेल्या मार्गावर हे ट्रक धान्य वितरण करत असून पुरवठा विभाग त्यांच्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवून आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत दिलेल्या वेळ आणि मार्गावरून हे ट्रक जात असल्याने महिन्याला साडेपाच हजार टन धान्य वतरण सुरळीत सुरू असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोषण आहारातील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि धान्य वितरण व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नुकतीच बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा पुरवठा विभागाला विशेष सूचना केल्या आहेत. धान्य वितरण व्यवस्थेमध्ये कोणतीही अनियमितता येवू नये, यासाठी धान्य वाहतूक करणार्‍या प्रत्येक वाहनावर जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार येथील जिल्हा पुरवठा विभागाचा आढावा घेतला असता जिल्हा पुरवठा विभाग गेल्या काही वर्षापासून सतर्क आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठराविक कालावधीमध्येच धान्य पुरवठा होणे आवश्यक बनले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular