21.4 C
Ratnagiri
Sunday, December 21, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeMaharashtraराज्यातील महिलांवर हात उचलला तर, त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन सुप्रिया...

राज्यातील महिलांवर हात उचलला तर, त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन सुप्रिया सुळेंचा इशारा

पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने पहायला मिळाले होते.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महिलांवर यानंतर हात उचलला तर हात तोडून हातात देईन, असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने पहायला मिळाले होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यांना मारहाण केली, असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्‍यांनी केला होता.

या प्रकरणी सुप्रिया सुळेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जळगावमध्ये वाढत्या महागाईवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. राज्यातील प्रत्येक महिलेचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला मिळाली आहे. मात्र यापुढे राज्यात कुठल्या पुरूषाने जर महिलांच्या अंगावर हात उचलला तर मी स्वतः तिथे जाईन आणि त्याविरोधात कोर्टात जाईन. त्याचा हात तोडून त्याच्या हातात देईन असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, स्थानिक भाजप युनिटने हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. सुळे यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी सर्व बाबतीत समान भूमिका घ्यावी. ते म्हणाले, खासदार नवनीत राणा यांच्याशी काय झाले, त्यानंतर तेत्या काहीच बोलले नाहीत. महिलांवर हल्ला झाला तेव्हा देखील त्या काहीच बोलल्या नाही. पोलिसांनी आमच्या महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले तेव्हा त्या काहीच बोलल्या नाही. अशी भूमिका त्यांनी अधिक वेळा घ्यावी, असे मला वाटते, आम्ही त्याचे नक्कीच स्वागत करू. महिलांशी गैरवर्तन करणे हा गुन्हाच आहे आणि त्याला वेळीच वाचा फोडून न्याय दिला पाहिजे.

RELATED ARTICLES

Most Popular