26.9 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeSindhudurgगोव्यातून आरोसबाग मार्गे सिंधुदुर्गात दारूची बेकायदेशीर वाहतूक, चालक अटकेत

गोव्यातून आरोसबाग मार्गे सिंधुदुर्गात दारूची बेकायदेशीर वाहतूक, चालक अटकेत

गोव्यातून आरोसबाग मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोटारीतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.

सिंधुदुर्गच्या बाजूलाच असलेल्या राज्यातून मद्य आणि तत्सम गोष्टी इतर राज्यांच्या मानाने कमी दरामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे अनेक वेळा छुप्या पद्धतीने गोव्याहून दारूची बेकायदेशीर खरेदी विक्री केली जाते. परंतु, पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीने अनेकवेळा असे बेकायदेशीर मनसुबे उधळण्यात येतात.

गोवा बनावटीच्या दारूची मोटारीतून बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने आरोसबाग येथे कारवाई करत २ लाख १५ हजार ५२० रुपये किमतीच्या दारुसह एकूण ५ लाख ६५ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकारणी मोटार चालक मनवेल कैतान डिसोझा रा. सावंतवाडी याचेवर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई रात्री उशिरा करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि,  गोव्यातून आरोसबाग मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोटारीतून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपाधीक्षक आर ए इंगळे, निरीक्षक एस पी मोहिते,  दुय्यम निरीक्षक टी बी पाटील, पी एस रासकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जगन चव्हाण, शाहूवाडी निरीक्षक एन एस देवणे, दुय्यम निरीक्षक एस बी यादव यांच्या पथकाने आरोसबाग येथे रात्री उशिरा सापळा रचला होता.

गोव्यातून आरोसबाग येथे येणाऱ्या स्विफ्ट मोटारीला एमएच. ४८ ए ६५०६ तपासणीसाठी थांबविण्यात आली. मोटारीच्या मागील डिकीत व सीटवर गोवा बनवटीच्या दारूचा बेकायदा मोठ्या प्रमाणात साठा आढळला. पथकाने विदेशी मद्याचे व बियरचे २ लाख १५ हजार ५२० रुपये किमतीचे ४२ खोके व ३ लाख ५० हजार रुपये किमतीची मोटार असा मुद्देमाल जप्त केला. संशयित चालकास ताब्यात घेण्यात आले. अधिकारी तपास दुय्यम निरीक्षक टी बी पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular