23.1 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraयंदाच्या वर्षी वाशी केंद्रातून आंब्याची निर्यात समाधानकारक

यंदाच्या वर्षी वाशी केंद्रातून आंब्याची निर्यात समाधानकारक

वाशी नवी मुंबई येथील पणन मंडळाच्या प्रक्रिया केंद्रातून आतापर्यंत सव्वा सातशे मेट्रीक टन आंबा अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरीयासहा युरोपमधील विविध देशामध्ये निर्यात करण्यात आला आहे.

कोकणातून मोठ्या प्रमाणात आंबा विक्रीसाठी मुंबई, पुणे, नाशिक अशा विविध ठिकाणी जातो आहे. सध्या आंब्याचा हंगाम संपत आला असून, सध्या अवकाळी पावसाच्या धोक्याने देखील पिकांचे नुकसान झाले. परंतु, त्यामध्ये देखील वाशी नवी मुंबई येथील पणन मंडळाच्या प्रक्रिया केंद्रातून आतापर्यंत सव्वा सातशे मेट्रीक टन आंबा अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरीयासहा युरोपमधील विविध देशामध्ये निर्यात करण्यात आला आहे. काही बागायतदारांनी थेट विदेशात आंब्याची मागणी पूर्ण केली आहे.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे निर्यातीत अनेक अडथळे निर्माण झाले होते. सर्वाधिक मागणी असलेल्या अमेरिकेमध्येही निर्यात होऊ शकला नव्हती. मात्र यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस अमेरिकेतील निरीक्षकांनी वाशी पॅकहाऊसची पाहणी करून निर्यातीला हिरवा कंदील दिला. त्यानंतर काही दिवसातच पहिली कन्साईनमेंट पाठविण्यात आली.

रत्नागिरीतून थेट निर्यात करण्यासाठी आवश्यक केंद्र आहे;  परंतु विमान वाहतुकीसाठी मुंबईत आंबा पाठवावा लागतो. तसेच निर्यातदारही मुंबईतील वाशी बाजारातूनच आंबा पाठवतात. निर्यातीसाठी आवश्यक आकाराचा आंबा एकाच बागायतदाराकडे उपलब्ध होत नसल्याने, वेगवेगळ्या व्यापार्यांकडून खरेदी करून वाशीतील व्यापाऱ्‍याकडे पुरेसा माल मिळतो. त्याचा फायदा निर्यात करणाऱ्‍यांना होतो. अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलिया, साऊथ कोरीया, इंग्लंड, जपान या देशांना आंबा निर्यात केला जात आहे.

रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, केशर, कर्नाटकी यासह अन्य प्रकारचे आंबे वाशी केंद्रातून निर्यात केले जातात. आतापर्यंत सुमारे सव्वा सातशे मेट्रीक टन आंबा पाठविण्यात आला आहे. त्यातील सर्वाधिक आंबा इंग्लंडला ३०० मे. टन इतका गेला आहे. त्या खालोखाल अमेरिकेचा क्रमांक लागतो. वाशीतील विकीरण प्रक्रियेचा वापर करून अमेरिकेत २९३ मे. टन, ऑस्ट्रेलियात २० मे. टन आंबा गेला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीची वाशी केंद्रातून आंब्याची निर्यात समाधानकारक झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular