27.8 C
Ratnagiri
Saturday, October 1, 2022

दोन जिल्ह्यांसाठी वन्य प्राण्यांसाठी अद्ययावत रुग्णवाहिका दाखल

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमधील वन्य प्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाच्या खारफुटी...

गुहागर पोलिसांनी पलायन केलेला आरोपीच्या ४ तासात मुसक्या आवळल्या

आरोपीला न्यायालयातून परत नेत असताना लघुशंकेला जायचे...

कडवईच्या डॉक्टरांची हजारो रुपयांची ऑनलाईन फसवणूक

जिल्ह्यातील ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या...
HomeRajapurगुरे आडवी आल्याने अपघात, आरामबस चालकाचा जागीच मृत्यू

गुरे आडवी आल्याने अपघात, आरामबस चालकाचा जागीच मृत्यू

राजापूर तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरील वाटूळ येथील तांबळवाडी फाटा येथे भीषण अपघात झाला.

महामार्गावरील वाहनांचा अमर्याद वेग आणि रस्त्यावर बसलेली मोकाट बेवारस गुरे यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत असतात. अनेकदा वाहनचालक बेफान होऊन वाहन चालवत असतात आणि अचानक रस्त्यात मधी गुरे आडवी आल्याने, वाहनावर कंट्रोल करणे कठीण बनते आणि गुराना वाचविण्याच्या नादामध्ये गाडीवरचा ताबा सुटून अपघाताच्या घटना घडतात.

राजापूर तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावरील वाटूळ येथील तांबळवाडी फाटा येथे भीषण अपघात झाला. रस्त्यावर जनावरे आडवी आल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक मारला. त्यामुळे या ट्रकवर मागून येणारी खाजगी आरामबस येऊन धडकली आणि अपघात झाला. यात आराम बसचे चालक राजेंद्र गावडे वय ३५,  रा. असरोंडी,  ता.कणकवली यांचा जागीच मृत्यू ओढवला आहे.

हा अपघात रात्री ८ वा. दरम्यान घडला आहे. कणकवलीहून राजेंद्र गावडे हे खाजगी आरामबस (एमएच ०४, जीपी ९३९९ घेऊन मुंबईला चालले होते. तर त्याच दिशेने लांजाकडे चिऱ्याचा ट्रकही एमडब्ल्यूके ४९० चालला होता. दरम्यान आरामबसच्या पुढे चालणा-या ट्रकच्या समोर वाटूळ येथील तांबळवाडी फाटा येथे अचानक जनावरे आडवी आल्याने ट्रक चालकाने अर्जंट ब्रेक मारल्याने ट्रक जागीच थांबला. मात्र पाठीमागून येणारी आरामबस थांबलेल्या ट्रकवर जाऊन जोराने आदळली. यामुळे ही धडक एवढी जोरदार होती की आरामबसचे चालक राजेंद्र गावडे यांचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

वेळोवेळी या बेवारस गुरांच्या मालकांना समज देऊन सुद्धा चारा पाण्यासाठी या गुरांना मोकळे सोडले जाते आणि मग हि गुरे अशा प्रकारे महामार्गावर येऊन बसल्याने अपघात होतात. अंधारामध्ये तर काहीवेळा हि बसलेली गुरे नजरेस सुद्धा पडत नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular