28.6 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriलग्नाला आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू

लग्नाला आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू

लग्न समारंभ आटोपून अनंत तेरवणकर आज दुपारी कोळंबे येथे धरणात आंघोळीसाठी गेले होते.

रत्नागिरीतील कोळंबे येथे गुरूवारी लग्न होते. या लग्न समारंभासाठी अनंत तेरवणकर व त्यांचे कुटुंबीय गेले होते. लग्न समारंभ आटोपून अनंत तेरवणकर आज दुपारी कोळंबे येथे धरणात आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. या धरणाजवळ कपडे धुवायला गेलेल्या महिलांनी त्यांना बुडताना पाहिले. महिलांनी गावात येऊन या घटनेची माहिती दिली.

लग्नासाठी आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी कोळंबे ता. रत्नागिरी येथे घडली. अनंत अर्जुन तेरवणकर वय ५२. रा. गोळप, तेरवणकरवाडी, रत्नागिरी असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव असून, ते एका लग्न समारंभारासाठी आले होते. या घटनेनंतर गोळप परिसरात शोककळा पसरली आहे. पाण्याचा अंदाज चुकल्याने त्यांनी पाण्यात गटांगळ्या खाल्ल्या, परंतु त्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला. लग्न घरामध्ये या दुखद घटनेमुळे शोककळा पसरली.

महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन अनंत तेरवणकर यांना पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात नेल्यावर तपासणी अंती डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत पूर्णगड पोलीस स्थानकात नोंद करण्याचे काम सुरु होते. अनंत तेरवणकर हे गोळप येथे एका बागेत कामाला होते. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी व भाऊ असा मोठा परिवार आहे. पाण्याचा अंदाज चुकल्याने लग्न घरामध्ये अचानक पणे अशा घडलेल्या अघटित गोष्टींमुळे आनंदाचे वातावरण पूर्णपणे बदळून गेले आणि दुखाचे सावट पसरले.

RELATED ARTICLES

Most Popular