27.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeTechnologyऑनलाइन पेमेंट करताना बाळगा विशेष सावधगिरी

ऑनलाइन पेमेंट करताना बाळगा विशेष सावधगिरी

स्मार्टफोनच्या एका क्लिकवर अगदी काही सेकंदामध्ये कोणत्याही ठिकाणाहून कोणालाही पैसे पाठवणे आणि रिसिव्ह करणे शक्य झाले आहे.

कोरोना काळापासून आणि आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर अगदी काही सेकंदामध्ये कोणत्याही ठिकाणाहून कोणालाही पैसे पाठवणे आणि रिसिव्ह करणे शक्य झाले आहे. यासाठी गुगल पे, पेटीएम आणि फोन पे सारखे डिजिटल वॉलेट देखील उपलब्ध आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी अशा अ‍ॅप्सचा वापर केला जातो. मात्र, असे अ‍ॅप्स वापरताना काळजी न घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. सध्या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे एक चूक देखील तुमचे बँक खाते काही सेकंदातच रिकामे होऊ शकते. त्यामुळे बँक आणि पोलीस कायमच या अ‍ॅप्सचा वापर करताना आणि ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घेण्यासाठी जागरूक करत असतात.

केवळ स्मार्टफोनच नाही तर असे पेमेंट अ‍ॅप्स मुख्यत्वे करून लॉक असणे गरजेचे आहे. अनेकदा फोन हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास एखादी व्यक्ती तुमचे बँक अकाउंट बरोबर छेडछाड करून ते रिकामे करू शकते. तसेच पासवर्ड ठेवताना देखील  नाव, मोबाइल नंबर आणि जन्मतारखेचा पासवर्ड ठेवू नये. त्याचप्रमाणे यूपीआय आयडी स्कान करून सुद्धा पेमेंट करता येते, तो यूपीआय पिन कोणासोबतही शेअर करू नये. तुमचा यूपीआय पिन इतरांना माहित असल्यास त्यात त्वरित बदल करणे गरजेचे आहे.

मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप अथवा मेलवर अनेक विविध स्किम्स आणि पैशांचे आमिष दाखवणारे मेसेज येतात. अशा मेसेज आणि ईमेलमधील लिंक्सवर क्लिक करू नये. सायबर गुन्हेगार बँक कर्मचारी असल्याचा दावा करत तुमची खासगी माहिती विचारून फसवणूक करतात. सर्व अ‍ॅप्ससाठी वेळोवेळी अपडेट जारी केले जाते. याद्वारे अ‍ॅपमध्ये नवीन सिक्योरिटी फीचर्स जोडले जातात. त्यामुळे यूपीआय पेमेंट अ‍ॅप्सला वेळोवेळी अपडेट करा. एकापेक्षा जास्त पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करणे टाळायला हवे. आणि कायम प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअर वरून केवळ व्हेरिफाइड अ‍ॅप्सच इंस्टॉल करावे.

RELATED ARTICLES

Most Popular