26.5 C
Ratnagiri
Thursday, April 18, 2024

अवकाळी पावसाची दापोलीत हजेरी

दापोली शहरासह तालुक्यात काल (ता.१५) रात्री अवकाळी...

कोकणची संस्कृती टिकवली विनायक राऊत

माझ्यावर टीका करणाऱ्या नारायण राणेंनी गेल्या ३९...
HomeEntertainmentएका परफ्यूम ब्रँडनं तयार केलेल्या जाहिरतीवरून वादंग निर्माण

एका परफ्यूम ब्रँडनं तयार केलेल्या जाहिरतीवरून वादंग निर्माण

या जाहिरातीवर सर्व सामान्यांनीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

भारतासारख्या देशात आता महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. तर मनोरंजन विश्वामधील अभिनेत्री देखील समान मानधन मिळावं आणि लैंगिक शोषणा विरोधात आवाज उठवायला सुरुवात करत आहेत. त्यातच आता एका वादग्रस्त परफ्यूमच्या जाहिरातीमुळे आणि त्याच्या डबल अर्थाच्या संवादामुळे एकच खळबळ उडाली आहे. शॉट नावाच्या एका परफ्यूम ब्रँडनं तयार केलेल्या जाहिरतीवरून वाद निर्माण झाला आहे.

या जाहिरातीवर सर्व सामान्यांनीच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी व्यक्त करणाऱ्यांमध्ये प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर यांचा समावेश आहे.

प्रियांका चोप्राने तिच्या ट्विटर हँडलवर या परफ्यूमच्या जाहिरातीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिनं ट्वीट केलं आहे की, अत्यंत लज्जास्पद आणि वाईट. या जाहिरातीसाठी किती पातळीवर मंजुरी घ्यावी लागते. किती लोकांना ही जाहिरात योग्य वाटली?  मला खूप समाधान वाटतं आहे की, ही जाहिरात अनेकांच्या अजिबात पसंतीस पडलेली नाही. अनेकांनी या जाहिरातीवर आक्षेप घेत त्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या जाहिराती विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.

फरहान अख्तर यानं देखील याप्रकरणी तीव्र संतापच व्यक्त केला आहे. त्यानं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, याला घाणेरड्या वासाचा स्प्रे म्हणायचं की गँगरेप’. हि अॅड काय विचार करून बनवली आहे. याला संमती कुणी दिली आहे. अत्यंत लज्जास्पद आहे !

रिचाने देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिनं लिहिलं की, ही जाहिरात काही दुर्घटना नाही. एखादी जाहिरात बनवण्यासाठी तिला विविध पातळ्या पार कराव्या लागतात. क्रिएटिव्ह, एजन्सी, क्लायंट, कास्टिंग असं बरंच काही. या प्रत्येकाचा असाच विचार आहे का बलात्कारही एक मस्करीची गोष्ट आहे का?

RELATED ARTICLES

Most Popular