26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriभूमिअभिलेख यंत्रणेचे कामात जलदता येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ९ ई.टि.एमचे वाटप

भूमिअभिलेख यंत्रणेचे कामात जलदता येण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ९ ई.टि.एमचे वाटप

जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील  यांच्या हस्ते संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांना आज ई.टि.एस मशीनचे वाटप करण्यात आले.

भूमि अभिलेख यंत्रणेचे काम जलदगतीने व्हावे यासाठी त्यांना जिल्हा नियोजन निधीतील नाविन्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत ९ इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत याचे वाटप जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. भूमी अभिलेख विभागाअंतर्गत मोजणी कामाचा जलद गतीने निपटारा करणेवर भर दिला जाता आहे. हे काम अचूक व उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिपूर्ण व्हावे या दृष्टीने रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी नाविन्य पूर्ण योजनेतून भूमी अभिलेख विभागासाठी ५५,००,०००/- रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.

सदर निधीतून ९ ई.टि.एम इलेक्ट्रोनिक टोटल स्टेशन मशीन खरेदी करण्यात आली आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील  यांच्या हस्ते संबंधित तालुक्यातील अधिकाऱ्यांना आज ई.टि.एस मशीनचे वाटप करण्यात आले. अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी एन. एन. पटेल यांनी दिली.

मोजणी कामी नविन तंत्रज्ञान व साहित्य मिळाल्याने मोजणी कामाला गती मिळणार आहे. सदरचे मशीन प्राप्त करून घेणे कामी राज्याचे जमाबंदी आयुक्त एम. के. सुधांशु साहेब, अप्पर जमाबंदी आयुक्त रायते, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे व जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

यावेळी उप अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी .के.व्हि. शिंदे, उप अधीक्षक भूमी अभिलेख गुहागर, एस.एम.शिंत्रे, उप अधीक्षक भूमी अभिलेख दापोली, .बी.जे.कोकणे, उप अधीक्षक भूमी अभिलेख राजापूर जी.एल.गिजबिले, उप अधीक्षक भूमी अभिलेख खेड .एस.बी.शिर्के, उप अधीक्षक भूमी अभिलेख चिपळूण डी. के. निकाळजे हे अधिकारी तसेच संबंधित तालुक्याचे कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular