इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारचा कर्करोग रेडिएशन, केमोथेरपी, ऑपरेशन किंवा कोणत्याही गुंतागुंतीच्या उपचारांशिवाय १००% बरा झाला आहे. कॅन्सरवर खात्रीशीर इलाज किंवा औषध नाही असे म्हणणे आता योग्य ठरणार नाही. याचे कारण म्हणजे गुदाशयाच्या कर्करोगावर म्हणजेच मलाशयाच्या पेशींमध्ये होणाऱ्या कर्करोगावर अमेरिकन शास्त्रज्ञांनी खात्रीशीर इलाज शोधून काढला आहे. अर्थात, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर अनेक वेगवेगळे उपचार आणि औषधे उपलब्ध होत आहेत.
यूएस, मॅनहॅटन येथील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमधील संशोधकांना आढळले की, डॉस्टारलिमॅब या विशिष्ट औषधाच्या वापराने गुदाशयचा कर्करोग असलेले रुग्ण १०० % बरे होण्यास मदत केली. हा अभ्यास द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे. या चाचणीत १८ रुग्णांचा समावेश होता आणि सर्व बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे. कर्करोग पूर्णपणे बरा करणारे हे औषध कोणते आहे आणि भविष्यात कर्करोगाच्या उपचारात काय मदत करू शकते हे जाणून घेऊया.
हे औषध मॅसॅच्युसेट्स-आधारित कंपनी टेसारोने बनवले आहे आणि त्याचे ब्रँड नाव जेंपार्ली आहे. असे सांगितले जात आहे की रुग्णांना हे औषध सहा महिने दिले गेले आणि प्रत्येक रुग्णाला त्याचा फायदा झाला आणि ते कर्करोगापासून पूर्णपणे मुक्त झाले. या औषधापूर्वी रुग्णांवर केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया इत्यादीद्वारे उपचार केले जात होते. विशेष म्हणजे हे औषध वापरल्यानंतर त्यांना पुढील उपचारांची गरजच भासली नाही.
तज्ज्ञांच्या मते, हे औषध प्रयोगशाळेत बनवले आहे ज्यामध्ये मोनोक्लोनल आहे आणि ते मानवी शरीरात अँटीबॉडीज सारखे काम करते. म्हणजेच हे औषध रोगाशी लढण्यासाठी अँटीबॉडीजच्या स्वरूपात काम करते. असे सांगितले जात आहे की चाचणी दरम्यान हे औषध घेतल्याने कर्करोग रुग्णांच्या इतर भागात पसरला नाही. हे औषध PD-1 नावाच्या कर्करोगाच्या पेशींमध्ये विशिष्ट प्रोटिनला ब्लॉक करण्यासाठी बनवले गेले आहे.