26.4 C
Ratnagiri
Thursday, April 25, 2024

माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणारः सुनिल तटकरे

निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी...

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव...

…तर बेरोजगारी कशी दूर होणार, प्रमोद जठार

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये...
HomeMaharashtraपनवेल महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम, महिलांना सुवर्णसंधी

पनवेल महानगरपालिकेचा अनोखा उपक्रम, महिलांना सुवर्णसंधी

पनवेल महानगरपालिका हद्दीतील महिलांना अवघ्या ५२० रुपयांत ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स मिळणार आहे

पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत अवघ्या ५२० रुपयांत गरजू आणि वाहन चालवण्याची आवड असलेल्या महिलांसाठी, गाडी चालवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी महिला बाल कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. एका वर्षात २०० महिलांना लाभ घेता येणार असल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाचे प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे. यासाठी पालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाकडे संपर्क करावा लागणार आहे.

 महानगरपालिका क्षेत्रातील गरजू महिलांना रोजगार मिळावा, त्यांना त्यांच्या पायावर स्वतः उभा राहता यावे यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जात असतात. या उपक्रमाच्या माध्यमातून आता पुन्हा गरजवंत महिला तसेच वाहन चालवण्याची आवड असलेल्या महिलांना पालिकेकडून अवघ्या ५२० रुपयांत ड्रायव्हिंग प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाला पालिकेकडून सुरवात झाली आहे.

त्यासाठी एका खासगी डायव्हिंग स्कूलची नेमणूक करण्यात आली आहे. या ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून महिलांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि याच वेळी हे लायसन्स दिले जाणार आहे. मात्र या लायसन्स साठी या महिलांना पुन्हा पक्क्या लायसन्ससाठी आरटीओकडे धाव घ्यावी लागणार आहे. किंवा ज्या ड्रायव्हिंग स्कूलमधून हे लायसन्स दिले गेले आहे. त्यांना पुन्हा वाढीव हजारो रुपये देऊन पक्के लायसन्स काढावे लागणार आहे. त्या मुळे या महिलांच्या खिशाला पुन्हा हजारो रुपयाची कात्री लागणार आहे. पालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमात अवघ्या १० दिवसात ७१ महिलांनी सहभाग नोंदवला आहे.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील महिलांना अवघ्या ५२० रुपयांत ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स मिळणार आहे. यामध्ये लाभार्थी महिलांना २१ दिवस गाडी चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिवसाला ७ किलोमीटर गाडी चालवता येणार आहे. तसेच हे स्कूल प्रशिक्षणार्थी महिलांना होम पिक अप सर्व्हिस देणार आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागाने सुरू केलेल्या या उपक्रमाला अवघ्या १० दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular