26.4 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

कामथेतील नदीत प्रदूषित पाणी विधानसभेत निकमांनी उठवला आवाज

नद्यांमध्ये रासायनिक सांडपाणी सोडणारे टँकर आणि साफ़यीस्ट...

रत्नागिरी रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली तरूणी नाशिकची?

रत्नदुर्ग किल्ल्यावरून रविवारी दुपारी खाली समुद्रात कोसळलेल्या...

चिपळूण-रत्नागिरी मार्ग होणार खड्डेमुक्त : पालकमंत्र्याचे आश्वासन

पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्षाची भाडेवाढ, आज रात्री पासून वाढ लागू

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्षाची भाडेवाढ, आज रात्री पासून वाढ लागू

खटुआ समितीच्या आदेशानुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पहिल्या १.६ कि.मी.च्या टप्प्यासाठी ३१ रुपये भाडे निश्चित केले आहे.

आजपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिक्षाची भाडेवाढ सुरु करण्यात आली आहे. पेट्रोलचे वाढते दर, सीएनजीची अनिश्चितता, रिक्षाची वाढती किंमत लक्षात घेऊन खटुआ समितीच्या आदेशानुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने पहिल्या १.६ कि.मी.च्या टप्प्यासाठी ३१ रुपये भाडे निश्चित केले आहे. त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठी २०.४९ एवढे भाडे केले आहे. रात्री १० ते ६ या कालावधीसाठी अतिरिक्त भाडे ५० टक्के निश्चित केले आहे. चार वर्षानंतर करण्यात आलेली ही भाडेवाड आज रात्रीपासून लागू झाली आहे.

त्यासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. यामध्ये रिक्षाच्या भाडेदर निश्चिती सुधारणा करण्याबाबत किमान भाडे निश्चित करण्यासाठी ठराव परिचलन पद्धतीने पारित केला. यापूर्वी १. ६ कि.मी. च्या पहिल्या टप्प्यासाठी २७ व पुढील प्रत्येक किमीच्या टप्प्याला १७.७० पैसे एवढी भाडेदर निश्चित केली होती. ती सुधारित भाडेवाढ २०१८ पासून लागू केली होती. सप्टेंबर २०१८ पासून वाढलेले पेट्रोलचे दर, ऑटोरिक्षाची किंमत, ऑटोरिक्षाचा विमा यांच्या वाढलेल्या किमतीचा विचार घेता नव्याने सुधारित भाडेदर करण्यात आली.

यासाठी खटुआ समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यातील ऑटोरिक्षाचे भाडेतर निश्चित करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांची १० जूनला बैठक झाली. परिचलन पद्धतीने ऑटोरिक्षा भाडेदर निश्चित केला आहे. रिक्षाचे पहिल्या १.६ कि.मी.च्या टप्प्यासाठीचे भाडे ३१ रुपये एवढे निश्चित केले आहे. त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठी २०. ४९ एवढी भाडे निश्चित केले आहे. रात्री १० ते ६ या कालावधीसाठी ५० टक्के जादा भाडे आकारले जाणार आहे. तसेच लगेजसाठी ३ रुपये एवढे भाडे निश्चित केले आहे. आज रात्रीपासून ही भाडेवाढ लागू झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular