22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriपोलीस वसाहतीचा प्रश्न वाऱ्यावर!

पोलीस वसाहतीचा प्रश्न वाऱ्यावर!

वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी फक्त काही दिवस वैयक्तिक सुट्ट्या घेत असणारा पोलीस वर्ग आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोणाची ! तहान भूक विसरून, १२-१२ तास उभे राहून उन्ह, वारा, पावसाचा विचार न करता देश सेवेसाठी झटत असतात. आणि त्यांच्याचं पोलीस वसाहतीची झालेली जीर्ण अवस्था नक्कीच विचार करायला लावणारी आहे.

रत्नागिरी मधील पोलीस वसाहत गेली कित्येक पावसाळे अशीच जीर्ण अवस्थेत उभी आहे. तात्पुरती डागडुजी करून पोलिसांचे संसार त्याच जागी वास्तव्य करत आहेत. मागील अंदाजे २-३ वर्षापासून पोलीस वसाहतीच्या बांधकामाचा प्रश्न हवेतच वीरत आहे. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या पोलीस आणि त्यांच्या कुटुंबाला कोणीच वाली नाही का?? जर रत्नागिरीमध्ये पोलिसांसाठी बहुमजली इमारत बांधण्याची मंजुरी मिळाली असून, काही कोटींचा निधीही मंजूर झाल्याचे जाहीर केले गेले असून, प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र अजून काहीच घडलेले नाही. पावसाळा तोंडावर आला असून यावर्षीही जीव मुठीत धरून पडझडीला आलेल्या वसाहतीमध्येच पोलिसांच्या कुटुंबाने वास्तव्य करायचे का? असा सवाल महाराष्ट्र समविचारी मंचने केला आहे.

प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातील पोलीस वसाहतीचा प्रश्न उद्भवतोच. कोरोना काळामध्येही फ्रंट लाईन वर्कर म्हणून पोलीस डॉक्टरांप्रमाणेच अथक परिश्रम घेताना दिसलेत. कित्येक पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाले, त्यातील काही जणांचा मृत्यूही ओढावला. पण तरीही पोलिसांच्या समस्या मार्गी लगत नाहीत. पोलिसांच्या वतीने मांडण्यात आलेल्या समस्येवर, जर पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला नाही तर, याबाबत महाराष्ट्र समविचारी मंचाचे बाबा ढोल्ये, महिला संघटक सोनाली कासार, जिल्हाध्यक्ष भडेकर आदी सदस्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular