27.7 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKokanटायर अभावी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड विभागातील शेकडो गाड्या जागीच उभ्या

टायर अभावी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड विभागातील शेकडो गाड्या जागीच उभ्या

गाडी वाहतुकीला पाठवणे योग्य नसल्याने रत्नागिरी विभागातील प्रत्येक आगारात १०-२० गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी साधारण पाच महिने केलेल्या संपामुळे जागेवर उभ्या राहिलेल्या बसेसना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एस टी कर्मचाऱ्यांच्या संपातुन हळू हळू पूर्वपदावर येणाऱ्या एसटीला पुन्हा एकदा ब्रेक लागण्याची चिन्हे निर्माण व्हायला लागली आहेत. रत्नागिरी येथील टायर प्लान्टला रबर पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून रबरचा पुरवठाच न झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि रायगड विभागातील शेकडो गाड्या टायर बदला अभावी जागीच उभ्या राहिल्या आहेत. याचा फटका मात्र शाळेतील विद्यार्थी,  नोकरदार वर्गाला बसला असून, आधीच ग्रामीण भागामध्ये काही अंशी बस सुरु करण्यात आल्या त्यामध्ये या टायरच्या अडचणीमुळे ग्रामीण भागातील एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले आहे.

रत्नागिरी येथील टायर प्लांट मधून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड विभागाला टायर रिमोल्ड करून पुरवले जातात. सद्या पावसाळा सूरु झाल्याने अनेक गाड्यांचे टायर हे रिमोल्ड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सदर गाडी वाहतुकीला पाठवणे योग्य नसल्याने रत्नागिरी विभागातील प्रत्येक आगारात १०-२० गाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील फेऱ्यांना बसला आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द होत असल्याचा फटका एस टी च्या उत्पन्नाला बसत आहे.

सद्या रत्नागिरी विभागाला २००० टायर, सिंधुदुर्ग विभागाला १००० टायर, तर रायगड विभागाला १००० टायर ची आवश्यकता आहे. मात्र टायर रिमोल्ड साठी लागणाऱ्या रबर चा पुरवठा करणाऱ्या कंपनी कडून होणाऱ्या दिरंगाईचा फटका एसटीला बसत आहे. याबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री . अनिल परब यांनी गांभीर्याने लक्ष देऊन रबर पुरवठा तात्काळ करून प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular