28.1 C
Ratnagiri
Friday, June 2, 2023

बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

शहराजवळील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुवारबाव एटीएम...

वाघळी पकडणारा सातारचा संतोष यादव सर्फ फिशिंग स्पर्धेमध्ये प्रथम

रत्नागिरी फिशर्स क्लब आयोजित ओपन सर्फ फिशिंग...

आजपासून मासेमारी बंदी कालावधी सुरू , नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर

शासनाच्या निर्देशानुसार १ जूनपासून मासेमारी बंदी सुरू...
HomeRatnagiriकोकण रेल्वेच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण कार्यक्रमापासून कोकणवासीय मात्र वंचित

कोकण रेल्वेच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण कार्यक्रमापासून कोकणवासीय मात्र वंचित

ऍड. पटवर्धन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य औदासिन्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोकण रेल्वेच्या मार्गाच्या १०० टक्के विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू येथून करण्यात आले. या निमित्ताने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुद्धा एका व्हिडीओ कॉन्फेरेंसिंग द्वारे या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणवासीयांसाठी मोठे काम केले आहे. मात्र या इतक्या महत्त्वाच्या कामाबाबत कोकण रेल्वे प्रशासन गंभीर नव्हते, प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळेच इतक्या महत्वाच्या कार्यक्रमात कोकणी जनता सहभागी होऊ शकली नाही असे स्पष्ट प्रतिपादन करून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाचा निषेध केला आहे.

यासाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपविभागीय अधिकारी वाघमारे, मिरजोळेचे सरपंच गजाजन गुरव यांच्यासह कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र कांबळे उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमासाठी स्थानिक जनता आणि कोकण रेल्वे प्रेमी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणवासीयांसाठी केलेल्या या योगदाना निमित्त निमंत्रण नसतानाही या कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन आणि भाजपाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहिले होते.

यावेळी बोलताना ऍड. पटवर्धन म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने कोकणवासीयांसाठी खूप मोठे काम केले असून त्या बद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. हा कार्यक्रम कोकणवासीयांसाठी खूपच महत्वाचा होता. देशाचे पंतप्रधान त्यांच्यासाठी काय योगदान देत आहेत हे त्यांना समजण्याचा, पंतप्रधानांना ऐकण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा असूनही कोकण रेल्वे प्रशासनाने मात्र मुद्दामच इथल्या कोकणातील जनतेला या कार्यक्रमात सहभागी करून घेतले नाही. यावेळी ऍड. पटवर्धन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाच्या अक्षम्य औदासिन्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

रेल्वे प्रशासनाने या कार्यक्रमासाठी वृत्तपत्रातूनसुद्धा कोकणी जनतेला निमंत्रण देण्याचे सौजन्य दाखवले नाही. त्यामुळेच हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम इथे रत्नागिरीत होऊनही इथली जनता या कार्यक्रमापासून वंचित राहिली आणि अशा महत्वपूर्ण घटनेचे साक्षीदार या जनतेला होता आलेले नाही. याबद्दल आम्ही निषेध करतो असेही ऍड. पटवर्धन म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular