26.4 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeKhedलोटेमधील केमिकल कंपनीला लागली आग

लोटेमधील केमिकल कंपनीला लागली आग

लोटे वसाहतीच्या अग्निशामक दलातर्फे आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत होते.

तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील बंद स्थितीत असलेल्या स्केप्टर केमिकल्स लिमिटेड या कंपनीत सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. केमिकल ड्रमचा स्फोट झाल्याने आग आटोक्यात येण्यास अडचण येत होती. या आगीत लोटे अग्निशमन दलाचा एक जवान गुदमरल्याने त्याला परशुराम रुग्णालयात ‘उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही आग कशी लागली याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहेत. सोमवारी लोटे परशुराम वसाहतीमधील बंद असलेल्या स्केप्टर कंपनीमधून आगीचे लोळ येत असल्याचे अनेक लोकांना दिसले.

दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. शेजारच्या कंपनीतील कामगार मिळेल त्या साहित्याने पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न करत होते. लोटे वसाहतीच्या अग्निशामक दलातर्फे आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात येत होते. मात्र कंपनीला लागलेली आग वाढतच होती. कंपनीत असलेल्या केमिकल्सच्या मचे स्फोट झाल्याने आग आणखी भडकली होती. त्यातच कंपनीमध्ये कॉस्टिंग पॉवडर असल्याचे सांगितले जात असतानाच अग्निशमन जवान यांना आग विझविताना ड्रम पेट घेत असल्याचे दिसत होते.

आग वाढल्याचे लक्षात येताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राचे जवान दीपक देवळेकर, गजानन जाधव, जयेश पवार, साहिल साबळे, अक्षय खोपकर आदी कर्मचाऱ्यांनी फोम लिक्विडचा वापर करून ही आग आटोक्यात आणली. दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान लागलेली आग दुपारी ३ वाजता आटोक्यात आली. या आगीमध्ये लोटे अग्निशमन दलाचे फायरमन खेडेकर यांच्या नाकातोंडात गॅस गेल्याने ते गुदमरले होते. त्यांना तात्काळ लोटे येथील परशुराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या सुत्रांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular