21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriखासगी कंपनीने रत्नागिरीकरांना घातला गंडा...

खासगी कंपनीने रत्नागिरीकरांना घातला गंडा…

जिल्ह्यातील सुमारे १२०० गुंतवणुकदारानी यात भाग घेतला.

एका खासगी कंपनीने सुमारे पावणेदोन कोटींचा गंडा घातला की काय, अशी चर्चा सध्या रत्नागिरीकरांमध्ये आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली ठेवी गोळा करून छोट्या उद्योजकांना कच्चा माल पुरवायचा. त्याच्याकडून तयार माल घेऊन त्याची विक्री करायची, अन् त्यावर पैसे मिळवायचे असा हा फंडा. जिल्ह्यातील सुमारे १२०० गुंतवणुकदारानी यात भाग घेतला तेव्हा पैसा मिळवण्याची त्यांना आशा होती. आता आपले पैसे बुडू नयेत आणि परत मिळावेत अशी त्यांची इच्छा आहे. कारण कंपनीच्या कथित प्रमुखांनी पळ काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुंतवणूकदारांना वाटत असलेल्या भीतीमुळे त्यापैकी काही कंपनीच्या कार्यालयावर धडकले. परंतु ग्रामीण ‘पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना रीतसर “तक्रार देण्याची विनंती केली. मात्र अद्याप कोणी तक्रार केलेली नाही. स्वतःचा उद्योग उभारा, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आम्ही देतो, कच्चा माल देखील आम्हीच पुरवतो तयार झालेले उत्पादन देखील आम्हीच खरेदी करतो, असे छान स्वप्नं दाखवले. आता फसगत झाली “असे वाटणाऱ्यांमध्ये बेरोजगारांपासून राजकीय पुढाऱ्यांचा देखील समावेश आहे. आज ग्रामीण पोलिसांनी या कंपनीत भेट दिल्याची देखील माहिती पुढे आली आहे.

उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सामुग्री देतो असे सांगत अनेकांकडून लाखो रुपये घेऊन कंपनीचे म्होरके आता गायब झाल्याची शंका व्यक्त होत आहे. या कंपनीतील स्थानिक कर्मचारी पैसे परत मागायला आलेल्यांच्या रोषाला बळी पडत आहेत. कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या मागे लागल्यावर केवळ पुढील तारखेचा चेक देण्यात येतो. मात्र असे देण्यात आलेले चेक देखील न वटल्याने अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत. सुमारे दीडशेहून अधिक कर्मचारी या कंपनीत काम करतात. यांचे पगार देखील थकले असल्याची चर्चा आहे.

पैसे परत घेण्यासाठी कंपनीत धाव – या कंपनीने मोठ-मोठ्या जाहिराती, सोशल मीडियावर उद्योग व्यवसाय उभारण्याचे व्हिडीओ टाकून गुंतवणूकदाराना आकर्षित केले. सुरवातीचे ३ ते ४ महिने गुंतवणुकदारांना चांगले पैसे मिळाले. परंतु त्यानंतर गुंतवणूक करूनही अनेकांना कोणतेच सामान, यंत्रसामुग्री अथवा कच्चा माल न मिळाल्याने आता पैसे परत घेण्यासाठी अनेकांनी या कंपनीत धाव घेतली आहे. या कंपनीच्या दोन कथित मोठ्या स्टोअर्समध्ये सर्व माल पडून आहे.

RELATED ARTICLES

Most Popular