27.2 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeRatnagiriरत्नागिरीत महिलेला लाखोंचा गंडा

रत्नागिरीत महिलेला लाखोंचा गंडा

चुकीच्या व्यवहारांमुळे त्याला फायनान्स कंपनीतून बडतर्फ केले होते.

एका फायनान्स कंपनीतील बडतर्फ असलेल्या कर्मचाऱ्याने अनोखा फंडा लढवला आहे. महिला ग्राहकाचे आधारकार्ड वापरून बनावट कागदपत्र तयार करून १ लाख १० हजार रूपयांचे कर्ज स्वतःच्या, खात्यात घेतल्याप्रकरणी तरूणाविरूद्ध शहर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० मे २०२३ ते २ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडली. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सुशांत अशोक कोडोलकर हा पूर्वी रत्नागिरीतील बजाज फायनान्स लिमिटेड रत्नागिरी शाखेत काम करीत होता. चुकीच्या व्यवहारांमुळे त्याला फायनान्स कंपनीतून बडतर्फ केले होते.

मात्र पूर्वी या ठिकाणी काम करीत असल्याने त्याला प्रत्येक ग्राहकाची माहिती होती तर काहींची आधारकार्डदेखील त्याच्याकडे होती. या फायनान्स कंपनीच्या जुन्या ग्राहक असलेल्या श्रुतिका शिरगांवकर यांच्या आधारकार्डवरून मूळ पत्त्यात बदल करून जिल्हा व पिनकोड बदलून त्या ठिकाणी सांगली जिल्हा व पिनकोड ४१६३०१ असा केला होता. तसेच शिरगावकर यांचा बंद असलेला मोबाईल क्रमांक वापरून श्रुतिका यांच्या फोटोच्या जागी एका अनोळखी महिलेचा फोटो वापरला होता. तसेच ग्राहकाचा मोबाईल नंबर वापरून ओटीपी त्या नंबरला न पाठविता मोबाईल बायपास करून त्यावर आधारकार्डवरील जन्म तारीख टाकत सॅमसंग कंपनीचा एस- २३ अल्ट्रा हा मोबाईल सांगली-आष्टा येथील बँचमधून स्वत:च्या आयडीवरून १० हजार रूपयांचे कर्ज मंजूर करून घेतले व त्याचे दोन हप्ते श्रुतिका यांच्या बँक खात्यातून कट झाले होते.

या प्रकरणात संशयित आरोपी सुशांत अशोक कोडोलकर याने बनावट कागदपत्र तयार करून फायनान्स कंपनीवर श्रुतिका शिरगांवकर यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्यानंतर रत्नागिरी शाखेमधील कर्मचारी राहुल बबन वाटील यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सुशांत कोडोलकर याच्याविरूद्ध भादंविक ४०९, ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular