25.4 C
Ratnagiri
Wednesday, October 4, 2023

जिल्ह्यात पावसाने २४ लाखांची हानी

सलग दोन दिवस वेगवान वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार...

रत्नागिरी मोर्चाने दणाणली, जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा आक्रोश

जुनी पेन्शन लागू करा, शाळांचे खासगीकरण थांबवा,...
HomeChiplunचिपळुणात प्रसिद्ध चष्म्याचे दुकान आगीत जळून खाक

चिपळुणात प्रसिद्ध चष्म्याचे दुकान आगीत जळून खाक

रात्री १२ वा.च्या दरम्यान त्यांच्या सावंत ऑप्टिशियन या दुकानातून वरच्या बाजूने धूर येत असल्याचे दिसून आले.

शहरातील प्रसिद्ध सावंत ऑप्टिशियन या चष्म्यांच्या दुकानाला रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता भीषण आग लागली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. नगरपालिकेचा अग्निशमन बंब तसेच शेकडो नागरिकांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल तासाभराने आग आटोक्यात आली. परंतु तो पर्यंत दुकानातील सर्व सामान बेचिराख झाले होते. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असून आगीचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. चिपळूण शहरात शिवाजी चौक चिंचनाका येथे सावंत यांचे चष्म्याचे दुकान आहे. चिपळूणमधील नामवंत आणि जुने दुकान असलेल्या या दुकानाला शैलेश सावंत यांनी अत्याधुनिक स्वरूप देऊन त्याचे भव्य शोरूममध्ये रूपांतर केले होते. नंबरचे चष्मे, चष्मा फ्रेमचे हजारो व्हरायटीज तसेच सर्व प्रकारचे सनग्लास गॉगल चे सावंत ऑप्टिशियन. शोरूम गेले कित्येक वर्षे ग्राहकांच्या पसंतीला उतरले होते. त्यामुळे ते शहरासह तालुक्यात देखील प्रसिद्ध होते.

अचानक धूर येवू लागला – रविवारी रात्री नेहमीप्रमाणे शैलेश सावंत दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री १२ वा.च्या दरम्यान त्यांच्या सावंत ऑप्टिशियन या दुकानातून वरच्या बाजूने धूर येत असल्याचे दिसून आले. काही वेळेतच धूर वाढला आणि संशय निर्माण झाला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. परंतु दुकान बंद असल्याने अडचण निर्माण झाली. शैलेश सावंत यांना बोलावण्यात आले. दुकान उघडताच आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या.

आगीने घेरले – आगीने दुकानाच्या आतील भागाला तसेच वरील भागाला पूर्णपणे घेरले होते. सर्व सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. आग क्षणाक्षणाला भडकत होती. नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने दाखल झाला आणि आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. सावंत ऑप्टिशियनला आग लागल्याचे वृत्त मध्यरात्री समजताच पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह पोलिसांची एक टीम तात्काळ दाखल झाली होती. तसेच माजी नगरसेवक बाळा कदम, किशोर रेडीज, संतोष टाकळे, विजय चितळे, इनायत मुकादम, अरुपण भोजने, उद्योजक वैभव रेडीज, बाळा आंबूलें, निहार कोवळे यांच्यासह शेकडोजण तसेच सर्व व्यापारी देखील घटनास्थळी हजर झाले आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

तासाभरात आग आटोक्यात – सुमारे तासाभरानंतर आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत दुकानातील ‘ चष्मे, गॉगल्स, संगणक, मशीन, कपाटे सर्वकाही जळून खाक झाले होते. या आगीमध्ये शैलेश सावंत यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी तहसीलदार तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र महावितरणचे अधिकारी याबाबत चौकशी करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular