24.5 C
Ratnagiri
Thursday, October 5, 2023

दोन महामार्गाचे काम अद्याप अर्धवत, तिसऱ्या महामार्गाला मंजुरी

मुंबई-गोवा महामार्ग आणि रेवस-रेड्डी महामार्गाचे काम अद्यापही...

भाट्ये, कर्ला समुद्रकिनारी पाण्याला जोरदार करंट

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे रत्नागिरीतील भाट्ये...

आमदार भास्कर जाधव सरकारविरोधात न्यायालयात

आमदार भास्कर जाधव यांनी आमदार निधीवाटपात दुजाभाव...
HomeEntertainmentअखेर आदिनाथ कोठारेने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन सोडले

अखेर आदिनाथ कोठारेने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मौन सोडले

चंद्रमुखीचा दौलतराव देशमाने जनतेला चांगलाच भावला. पण त्याच वेळी अजून एका वेगळ्याच चर्चेने लक्ष वेधून घेतले.

मराठी सिनेमा चंद्रमुखी प्रदर्शित झाला आणि आदिनाथ कोठारे त्याच्या कथानकेतील भूमिकेमुळे अधिक चर्चेत आला. चंद्रमुखीचा दौलतराव देशमाने जनतेला चांगलाच भावला. पण त्याच वेळी अजून एका वेगळ्याच चर्चेने लक्ष वेधून घेतले. ती म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्यामध्ये काहीतरी  बिनसलं औष्ण ते दोघं विभक्त होणार आहेत. सोशल मीडियावर अशी गोष्ट व्हायरल झाल्याने, या गोष्टींना उतच आला. मग आदिनाथ कोठारेने अखेरं खरं काय ते सांगितले.

उर्मिलासोबत तुझं आता पटत नाही, तुम्ही वेगळे होणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावर आदिनाथ  जोरात हसला आणि त्यानंतर म्हणाला, ‘अशा बातम्या आम्हाला पण मिडियामधूनच कळतात त्या आम्ही  वाचतो आणि त्यावर दोघही खूप हसतो. सध्या आम्ही दोघंही खूप बिझी आहोत.’ उर्मिलाचीही तुझेच गीत मी गात आहे या सीरियलचे चित्रीकरण सुरू आहे.

आदिनाथ सकाळीच सिंगापूरहून आला. दुपारी त्याच्या ऑफिसमध्ये त्याला सरप्राइज पार्टी दिली. त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी मुलगी जीजाला घेऊन तो ऑफिसला आला होता. आदिनाथची लेक जीजाही आता मोठी झाली आहे. आदिनाथ म्हणतो, तिला पुरेसा वेळ देणं हे आम्हा दोघांसाठी देखील तारेवरची सर्कस आहे. पण ती आम्ही आमच्या मुलीसाठी करतो. उर्मिलानंही आदिनाथच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत, तिनं माझी साथ आणि शुभेच्छा कायम तुझ्या सोबत आहेत, असं म्हटलं आहे.

लावणीसम्राजी चंद्रा आणि धुरंदर राजकारणी दौलत देशमाने यांच्या प्रेमाची हळुवार किनार असलेला आणि एका लावणी कलावंताचं आयुष्य मांडणारा चंद्रमुखी हा सिनेमा गेल्या वर्षभरापासूनच चर्चेत होता. कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या कादंबरीचं चंद्रमुखी सिनेमात रूपांतर करण्यात आलं आहे. अखेर ही विश्वास पाटलांची कादंबरीतील चंद्रमुखी मोठ्या पडद्यावर अवतरली.

RELATED ARTICLES

Most Popular