32.2 C
Ratnagiri
Friday, April 19, 2024

सूर्यकुमार यादवचे नंबर 1 स्थान धोक्यात, पाकिस्तानी फलंदाज जिंकू शकतात

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या...

मुंबईत गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद

उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाडयामुळे होणारी...

चिपळुणात नारायण राणेंचा दोन दिवस मुक्काम

महायुतीच्या मेळाव्या निमित्ताने चिपळूणमध्ये आलेले केंद्रीय मंत्री...
HomeRatnagiriरखडलेल्या ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्त्याच्या कामाचा अखेर श्रीगणेशा

रखडलेल्या ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्त्याच्या कामाचा अखेर श्रीगणेशा

सोमवार पासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली असून अणुस्कूरा घाटातून कामाला शुभारंभ करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

ठेकेदारांचा वाद आणि तांत्रिक मुद्यामध्ये अडकलेल्या राजापूर तालुक्यातील सुमारे साडेसात कोटी रूपयांचा निधी मंजूरीनंतर ओणी-पाचल-अणुस्कुरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवार पासून रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली असून अणुस्कूरा घाटातून कामाला शुभारंभ करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. मात्र, येत्या काही दिवसांमध्ये पावसाळा सुरू होण्याचा अंदाज वर्तविलेला असल्याने पावसाळ्यापुर्वी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान ठेकेदार आणि बांधकाम विभागापुढे उभे राहिले आहे.

गतवर्षीच्या अतिवृष्टीच्या काळात आंबा घाटाची झालेली दुर्दशा लक्षात घेऊन, घाटमाथा परिसराकडे जिल्हाभरातून जाण्यासाठी तालुक्यातील ओणी-पाचल-अणुस्कूरा हा एकमेव पर्यायी मार्ग मोकळा उरला  होता. त्यामुळे जिल्ह्याभरातील अवजड वाहतूक या मागार्ने सुरू होती. सातत्याने सुरू असलेल्या या वाहतूकीमुळे या रस्त्याची सुद्धा पार दुरावस्था झाली आहे. रस्त्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेकवेळा अपघातासारखे बाका प्रसंगही या मार्गावर निर्माण होतात. त्यामुळे या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी काम करावे अशी मागणी वाहन चालकांसह सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जात आहे.

पाचलवासियांकडून पाचल ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नुकतेच धरणे आंदोलनही छेडण्यात आले होते. पाचल ग्रामविकास मंडळानेही प्रशासनाला निवेदन देवून त्यांचे लक्ष वेधले होते. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे साडेसात कोटी रूपयांच्या निधीला मंजूरी मिळालेली आहे. मात्र, तांत्रिक वादामध्ये निविदाप्रक्रीया रखडली होती. अशा स्थितीमध्ये पावसाळा काहीच दिवसावर येऊन ठेपला असताना, कामाचा शुभारंभ होत नसल्याने पाचलवासियांमधून तीव्र संताप आणि नाराजगी व्यक्त केली जात होता.

दरम्यान, अणुस्कूरा-पाचल-ओणी या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रीयेवरील तांत्रिक वादावर अखेर तोडगा निघाला असून आजपासून रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. अणुस्कूरा घाटातून कामाला सुरूवात झाली असून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular