27.5 C
Ratnagiri
Saturday, April 20, 2024

सलमान खान गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, हल्लेखोरांनी घेतली होती खास ट्रेनिंग

सलमान खान गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींची मुंबई...

अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागे – उदय सामंत

उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी...

‘हर घर मशाल’ अभियानाच्या माध्यमातून चिपळुणात महाविकास आघाडीची एकजुट

भक्कम अशी एकजूट दाखवत महाविकास आघाडीने चिपळूणमध्ये...
HomeRatnagiriआंजणारी पुलावर झालेल्या अपघातामुळे, महामार्ग बंद

आंजणारी पुलावर झालेल्या अपघातामुळे, महामार्ग बंद

सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक देवधे मार्गे काहीवेळ वळवण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथील आंजणारी पुलावरून एल.पी.जी गॅस चा टँकर नदीत उलटला. यामध्ये चालक टँकर काह्ली अडकून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिस, लांजा पोलिस ,रुग्णवाहिका तसेच हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. नदीत उलटलेल्या टँकरमधून  गॅस गळती सुरू झाली असून सद्यस्थितीत एलपी गॅस कंपनीचे अधिकारी घटना स्थळी पोहचले आहेत.

गुरुवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या आंजणारी येथील काजळी नदीत टँकर कोसळण्याची हि घटना घडली आहे. गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर अनावधानाने कठडा तोडून नदीमध्ये कोसळला. लांजा पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या अपघातात टँकरच्या मागून एलपीजी गॅसची गळती थोड्या प्रमाणात सुरू झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई गोवा महामार्ग रात्रभर बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक देवधे मार्गे काहीवेळ वळवण्यात आली आहे.

 संपूर्ण प्रकरणाची गंभीरता पाहता मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. तसा मेसेज देखील सोशल मिडीयाच्या सहाय्याने सर्वत्र देण्यात आला, जेणेकरून महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची गैरसोय होणार नाही. सध्या एल.पी.जी गॅस कंपनीच्या तज्ञांची टीम गोवा आणि उरण येथून घटनास्थळी दाखल झाली असून, त्यांच्याकडून अपघातग्रस्त टँकरमधला गॅस सुरक्षितरित्या बाहेर काढला जाऊन त्यानंतरच लवकरच वाहतूक पूर्वपदावरती येणार आहे. तूर्तास देखील महामार्ग बंद ठेवल्याने तो सुरु कधी करण्यात येईल त्याबाबत अजूनही निश्चित झाले नाही आहे.

RELATED ARTICLES

Most Popular