25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeRatnagiriबेपत्ता व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी, रत्नागिरीतील तिघांना अटक

बेपत्ता व्यापाऱ्याच्या खून प्रकरणी, रत्नागिरीतील तिघांना अटक

कोठारी १९ सप्टेंबरला रात्री साडे आठच्या सुमारास त्रिमुर्ती ज्वेलर्समध्ये गेल्याचे दिसले. परंतु दुकान बंद होईपर्यंत ते तिथून बाहेरच न पडल्याचे दिसून आले

रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसामध्ये कसोसीने युद्ध पातळीवर तपास करून ठाणेतील बेपत्ता ज्वेलर्स प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. २८ सप्टेंबरपर्यंत तीन संशयित आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी किर्तीकुमार कोठारी नेहमी व्यापारासाठी रत्नागिरीतील ज्या ज्वेलर्स दुकानांमध्ये जायचे, त्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. किर्तीकुमार कोठारी १९ सप्टेंबरला रात्री साडे आठच्या सुमारास त्रिमुर्ती ज्वेलर्समध्ये गेल्याचे दिसले. परंतु दुकान बंद होईपर्यंत ते तिथून बाहेरच न पडल्याचे दिसून आले. तसेच सदर ज्वेलर्स दुकानाचा मालक व इतर दोन अनोळखी व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या.

किर्तीकुमार कोठारी यांच्या मुलाने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी व्यापारी भूषण खेडेकर, रिक्षाचालक महेश मंगलप्रसाद चौगुले व फरीद महामूद होडेकर यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपासावर लक्ष केंद्रीत करून त्रिमुर्ती ज्वेलर्स दुकानाचा मालक भुषण सुभाष खेडेकर वय ४२ वर्षे, रा. दत्त मंदिर समोर, खालची आळी, ता. जि. रत्नागिरी याला पोलीस ठाण्यात आणले.

किर्तीकुमार कोठारी यांच्या नातेवाईकांसमक्ष त्याची सखोल चौकशी केली. खेडेकरने दिलेली माहिती व पोलिसांनी पाहिलेले सीसीटीव्ही फुटेज यामध्ये तफावत दिसून आली. त्यावर पोलिसांनी किर्तीकुमार कोठारी यांचा घातपात झाल्याच्या दृष्टीने तपास केला. तेव्हा भूषण खेडेकर याने पोलिसांना किर्तीकुमार कोठारी यांचा त्याने व त्याचे मित्र महेश मंगलप्रसाद चौगुले वय ३९ वर्षे, व्यवसाय रिक्षा चालक बेग फायनान्स, रा. मांडवी, सदानंदवाडी, ता.जि. रत्नागिरी आणि फरीद महामूद होडेकर वय ३६ वर्षे, रा. भाट्ये, खोतवाडी, ता. जि. रत्नागिरी अशा तिघांनी मिळून किर्तीकुमार कोठारी यांना त्रिमुर्ती ज्वेलर्स दुकानामध्येच हाताने व दोरीने गळा आवळून ठार मारले आणि मृतदेह दुकानामध्येच ठेवल्याची माहिती दिली.

तसेच रात्री  कोठारी यांचा मृतदेह गोणीत घालून, तो दुकानातून बाहेर काढून, फरीद होडेकर व महेश चौगुले याच्या रिक्षातून नेल्याचे सांगितले. यांचा मृतदेह भातगांव आबलोली रोडवरील एका पऱ्यात फेकून दिल्याचे आरोपीनी काबुल केले.

RELATED ARTICLES

Most Popular