मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणी येथे एर्टिगा आणि वेगनअर या दोन वाहनाच्या अपघातात दोन्ही वाहनांमधील ७ प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुम ारास घडली असून. अपघाताची बातमी समजताच संगमेश्वर पोलीस दाखल झाले. जखमीना १०८ रुग्णवाहीका व खासगी वाहनाने संगमेश्वर येथीक ग्रामीण रुग्णांलयात हलवण्यात आले. एर्टिगा आणि वेगनअर या दोन वाहनांचा भीषण अपघात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन पासून जवळच असलेल्या मोरया ढाब्या समोर झाला. एर्टिगा चालक अतुल आंनद किशोर नंदा वय ३४ मूळ राहणार फरीदाबाद हा गोवा ते मुंबई अंधेरी येथे जात होता तर वेगनअर चालक ओंकार शंकर घाडगे वय २३ वर्ष राहणार पाटण (आंबळे) हा सातारा ते गणपतीपुळे जात असताना सुसाट वेगात येणाऱ्या एर्टिगा चालकाने वेगनअर ला समोरासमोर जोरदार धडक दिली ही धडक एवढी जबरदस्त होती की गोव्याच्या दिशेने धावणाऱ्या ‘वेगनअर मुंबईच्या दिशेने फिरली होती.
अपघातानंतर एर्टिगाच्या एअर बॅग उघडल्याने होणारी जीवित हानी टळली. एर्टिगा चालक अतुल नंदा, लिंडा मेलवीन डिकॉस्टा वय वर्ष ५८ अंधेरी, शॉन मेलवीन डीकॉस्टा वय वर्ष २४ राहणार अंधेरी, ह्यांना मार लागला असून लिंडा मेलवीन या महिलेच्या डोक्याला मार लागला तसेच पायालाही दुखापत झाली आहे तर वेगनअर मधील ओंकार घाडगे वय वर्षे २३, अभिजित अशोक खरात वय वर्ष २४ राहणार सातारा, प्रदीप लक्षण माने वय वर्ष २० राहणार सोलापूर यांना मार लागला असून ह्या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. लिंडा मेलवीन हिच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी इतरत्र हलवण्यात आले आहे.
अपघात झाल्यामुळे मुंबई तसेच गोवा च्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, पोलीस कॉन्सटेबल अवॉर्ड यांनी अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळी पोहचून रखडलेली वाहन वर्दल सुरळीत केली. व जखमीना स्थानिकांच्या मदतीने १०८ रुगमवाहीका व खासगी वाहनाने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलवले. अपघाताचा पुढील तपास वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप. नी. चंद्रकांत कांबळे करीत आहेत.