23.4 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

विराट कोहली एक हजारी क्लबमध्ये सामील होणार…

यजमान भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या...

या दिवशी थिएटरमध्ये फक्त 99 रुपयांमध्ये चित्रपट पहा…

चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 20...

चाकरमान्यांची कोकण रेल्वे, मुंबई-गोवा महामार्गावर गैरसोय

कोकणात सणाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्या चाकरमानी लोकांची...
HomeRajapurराजापूर रेल्वेस्थानकानजिक अपघात एसटी बसवर दुचाकी आदळली

राजापूर रेल्वेस्थानकानजिक अपघात एसटी बसवर दुचाकी आदळली

दुचाकीस्वार सौंदळकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

राजापूर रेल्वेस्टेशन समोरील उतारावर झालेल्या दुचाकी व एसटी बसच्या समोरासमोरील धडकेत दुचाकीवरील तरूण गंभीर जखमी झाला त्याला असून अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलविण्यात आले आहे. मात्र एसटी बस चालकाच्या प्रसगांवधनामुळे दुचाकीस्वार बसच्या मागील चाकांखाली न गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. राजापूर आगारातून सकाळी ८.३० वा. राजापूर व्हाया रेल्वेस्टेशन फुपेरे ही फेरी चालू आहे. चालक प्रकाश वुईके ही एसटी बस घेऊन शुक्रवारी सकाळी रेल्वेस्टेशनला जात होते. दरम्यान सोल्ये येथील तरूण गिरीश सौंदळकर हा दुचाकीवरून ससाळे येथील दवाखानामध्ये जात होता.

सोल्ये येथील उतारावर एसटी बस आली असता समोरून येणारी एसटी पाहून सौदळकर याचा दुचाकीवरील ताबा सुटला व सुमारे १० फुट दुचाकीवरून फरफटत जात सौंदळकर एसटी बसवर जाऊन आदळला. एसटी चालक वुईकेच्या हे लक्षात येताच त्यांनी एसटी बसचा वेग कमी करीत बस गटारामध्ये उतरविली. दरम्यान सौंदळकर हा एसटी बसवर आदळून बसच्या खाली गेला. त्याच दरम्यान एसटी बस चालकाने त्वरित बसु वेग आवरून गटारात उतरवलेली असल्याने सौंदळकर बसच्या मागील चाकाखाली जाता-जाता वाचला अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

बसवर व जमिनीवर जोरदार आपटल्याने दुचाकीस्वार सौंदळकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताचे वृत्त समजताच येथील रिक्षा व्यावसायिक व ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश सौंदळकर व त्यांच्या सहकाऱ्यानी गंभीर जखमी झालेल्या सौंदळकर याला त्वरित येथील उपचारासाठी रत्नागिरीला हलविले. एसटी बस चालकाच्या प्रसगांवधनामुळे मोठा अनर्थ टळला अशा भावना व्यक्त होत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular