25.3 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...

निवडणुकांच्या रणधुमाळीत जिल्हयात राष्ट्रवादीला ‘जोर का झटका’, रमेशराव कदमांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य, विद्यमान राष्ट्रवादी...
HomeRatnagiriहातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी मंदीर रस्त्यावर मोटार आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दाम्पत्य जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शशिकांत गजानन सनगरे (वय ३७ रा. हातखंबा) व जान्हवी शशिकांत सनगरे (वय ३२) अशी गंभीर जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. हा अपघात बुधवारी (ता. १४) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खेडशी महिलक्ष्मी मंदिर येथील सुचना फलका जवळ झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत सनगरे हे दुचाकीवरुन आपली पत्नी जान्हवी हिला मागे बसवून सायंकाळी हातखंबाहून रत्नागिरीकडे येत होते. ते खेडशी येथील महालक्ष्मी मंदिर येथील रस्त्यावर आले असताना दिशा दर्शक (डायव्हर्शन) येथे मोटरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. ओमकार रवींद्र मांडवकर (वय ३१, रा. गोळप, ता. जि. रत्नागिरी) हे मोटर चालवत होते, असे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

दिशादर्शक (डायव्हर्शन) न कळल्याने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरिल दाम्पत्य शशिकांत व जान्हवी सनगरे ही दोघ गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, मोटार आणि दुचाकीचा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. मोटारीचे बॉनेट व दुचाकीची दुरवस्था झाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती. या अपघातानंतर मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले होते.

RELATED ARTICLES

Most Popular