20.5 C
Ratnagiri
Tuesday, December 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunचिपळुणात अवैध व्यवसायांवर कारवाई

चिपळुणात अवैध व्यवसायांवर कारवाई

या दोन्ही ठिकाणच्या हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त करून तेथील साहित्य जप्त केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार सावर्डे-कोष्टीवाडीसह नारदखेरकी येथे दोन ठिकाणी गावठी दारूच्या हातभट्टीवर व पोफळी येथे एका विक्रेत्यावर गुरुवारी (ता. २४) पोलिसांनी छापा टाकला. यात लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणच्या हातभट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त करून तेथील साहित्य जप्त केले. प्रसाद अनंत हळदणकर (नारदखेरकी), श्रीपत सीताराम शिर्के (६७, पोफळी- शिर्केवाडी); तर एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद चिपळूण ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक अनुराधा मारुती मेहेर, सारिका सुदेश जाधव (सावर्डे पोलिस ठाणे), सुहास बापूराव साजूरे (अलोरे-शिरगाव पोलिस ठाणे) यांनी दिली आहे. सावर्डे-कोष्टेवाडी येथे झाडाझुडपामध्ये एक महिला गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती सावर्डे पोलिसांना मिळाली.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्यासह पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी अचानक छापा टाकला. यावेळी संबंधित महिला भट्टी लावून गावठी दारू गाळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी संपूर्ण हातभट्टी उद्ध्वस्त केली. यात १ लाख १२ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना जप्त केला असून, १ हजार रुपये किमतीची १० लिटर दारू, १ लाख १० हजार किमतीचे नवसागर मिश्रित कुजके रसायन, तर अन्य साहित्याचा समावेश आहे. या प्रकरणी त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, तालुक्यातील नारदखेरकी बंधारा या ठिकाणी प्रसाद हळदणकर हातभट्टी बांधून दारू गाळत असताना चिपळूण पोलिसांनी त्याच्यावर छापा टाकला. त्याच्याकडून ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच श्रीपत शिर्के हा त्याच्या घराच्या पाठीमागे नारळाच्या झाडाखाली गावठी दारू विक्री करत असताना त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular