26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeRatnagiriबंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी नौकांवर कारवाई

बंदी कालावधीत बेकायदेशीर मासेमारी नौकांवर कारवाई

३१ जुलैपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी आहे.

बंदी आदेश धाब्यावर ठेवून जिल्ह्याच्या सागरी जलधी क्षेत्रात बेकायदेशीर मासेमारी होत आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाले असून, मत्स्य व्यवसाय विभागाने दोन मच्छीमारी नौकांवर कारवाईही केली आहे. या परिसरात अन्य नौका मासेमारी करत असल्याचेही पुढे आले आहे; मात्र, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे मच्छीमारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मच्छीमारी बंदी कालावधी एक जूनपासून सुरू झाला. त्यानंतरही मच्छीमारी करणाऱ्या २ नौका मत्स्य व्यवसाय विभागाने पकडल्या आहेत. त्यातील एक पर्ससीन आणि दुसरी मिनी पर्ससीन नौका आहे. त्यातील एका नौकेचे नाव अरहान तर दुसऱ्या नौकेचे नाव आयशा असे आहे.

या नौका मिरकरवाडा आणि फणसोप येथील असल्याचे मत्स्य विभागाकडून सागंण्यात आले. ३१ जुलैपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात जाण्यास बंदी आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाला जोर नव्हता. त्याचबरोबर वातावरणही चांगले होते. त्यामुळे अनेक नौका याचा फायदा घेऊन बंदी आदेश धाब्यावर बसवत मासेमारी करत आहेत. मत्स्य विभागाच्या कारवाईवरून हे स्पष्ट होत आहे. गस्त वाढवून या बेकायदेशीर मासेमारीला आळा घालण्याची गरज असल्याची पारंपरिक मच्छीमारांची मागणी आहे. गेले दोन दिवस पाऊस नाही. या वातावरणाचा मच्छीमार फायदा उठवत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात २ हजार ५२० नौका असून, त्यातील २ हजार ७४ यांत्रिकी नौका आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular