27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन एक्सप्रेसना अतिरिक्त डबे

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन एक्सप्रेसना अतिरिक्त डबे

कोकण मार्गावरून धावणाऱ्या १० एक्सप्रेस गाड्यांना शुक्रवारी 'लेटमार्क' मिळाला.

कोकण मार्गावरून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस – कोच्युवेलीसह एलटीटी- मडगाव या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वातानुकूलित व स्लीपर श्रेणीच्या डब्यांची ही संख्या कमी करून जनरल श्रेणीचे अतिरिक्त डबे वाढवण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने गुरुवारी सायंकाळी जाहीर केले. यामुळे आरक्षण न मिळालेल्या अन् आयत्या वेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. २२११३/२२११४ क्रमांकाच्या एलटीटी-कोच्युवेली एक्सप्रेसचा श्री टायर वस्लीपरचा एक असे दोन डबे कमी करून जनरल श्रेणीची २ डबे जोडण्यात येणार आहेत. यामुळे जनरलचे डबे ४ होणार असून सर्व श्रेणीतील डब्यांची संख्या पूर्वीप्रमाणेच २२ इतकीच राहणार आहे.

३० नोव्हेंबरपासून हा बदल करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने नुकतेच स्पष्ट केले आहे. ११०९९/१११०० क्रमांकाच्या एलटीटी-मडगाव २२ एलएचबी डब्यांची धावणाऱ्या गाडीला स्लीपरचे ८ डबे आहेत. हे डबे ६ करून २ जनरल श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत. यामुळे एक्सप्रेसचे ४ जनरल डबे होणार आहेत. १ डिसेंबरपासून हा बदल होणार आहे. दोन्ही एक्सप्रेस गाड्यांना जोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त डब्यांमुळे ‘प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांची चिंता दूर होवून आयत्यावेळी प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

कोकण मार्गावर १० एक्सप्रेस गाड्यांना ‘लेटमार्क’ – कोकण मार्गावरून धावणाऱ्या १० एक्सप्रेस गाड्यांना शुक्रवारी ‘लेटमार्क’ मिळाला. मंगळूर- सीएसएमटी एक्सप्रेस ५ तास तर मत्स्यगंधा एक्सप्रेस ४ तास विलंबाने खाना झाली. सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेससह हिसार- कोईमतूर एक्सप्रेस २ तास ४० मिनिटे उशिराने धावल्या. मंगळूर- उधना ३ तास २० मिनिटे उशिराने रवाना झाली. एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्सप्रेस तिरुवअनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस, तिरूनेलवेली-गांधीधाम एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला.

RELATED ARTICLES

Most Popular