24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeLifestyleस्क्रीन टाईमवर कंट्रोल करणे आवश्यक

स्क्रीन टाईमवर कंट्रोल करणे आवश्यक

कोरोनामुळे ऑफिसमध्ये जाऊन काम करणे बंद झाल्याने जास्तीत जास्त घरातून काम केल्याने स्क्रीन टाइम आपोआपच वाढला आहे. लॅपटॉप, फोन,  टॅब्लेट यांसारख्या वेगवेगळ्या स्क्रीन्सवर आपण जास्त वेळ घालतो. यामुळे डोळ्यांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिवाय सतत एकाच जागी बसून शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे वजन वाढण्याच्या देखील समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

मोबाईल, लॅपटॉप आणि टिव्ही सतत बघितल्यामुळे बऱ्याच वेळा डोळ्यांना थकवा येतो. डोळ्यांवर परिणाम व्हायला सुरुवात होते. लॅपटॉप आणि मोबाईलवर काम करत असताना डोळ्यांवर ताण पडतो. त्यावेळी थोडा ब्रेक घेणे अत्यंत गरजेचे असते. दिवसातून साधारण १० ते ११ तास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम सुरु असते. त्यामुळे अखेर आपले डोळे थकतात. दीर्घकाळ स्क्रीनकडे पाहणे, थकवा आणि झोपेची कमतरता यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

डॉक्टरांच्या मते,  रात्री मिळालेली चांगली झोप डोळ्यांची सूज कमी होऊ शकते. प्रत्येकाने रात्री ८ ते ९ तास झोप घेतली पाहिजे. कोरोनामुळे अजूनही बहुतेक लोकांची ऑफिसची कामे वर्क फ्रॉम होम सुरु आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांसमोर दीर्घकाळ काम करण्याची सवय देखील वाढली आहे. ऑफिसमधील सतत कामाच्या ताणामुळे डोळ्यांवर जास्त ताण येऊ नये म्हणून विश्रांती घेणे आवश्यक आहे.

काम करताना येणारा थकवा दूर करण्यासाठी आपण कॉफी पितो. मात्र, सतत चहा, कॉफी सेवन करणे  आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. कॉफीमुळे झोप कमी होऊ शकते, ज्यामुळे डोळ्यांभोवती सूज वाढण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी ६ तास आधी कॅफिनचे सेवन बंद केले पाहिजे.

RELATED ARTICLES

Most Popular