29.2 C
Ratnagiri
Sunday, July 13, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeRatnagiri९ महिन्यानंतर खूनाला वाचा फुटली

९ महिन्यानंतर खूनाला वाचा फुटली

पोलिसांकडून सुमारे १०० हून रांची जबाब नोंदविण्यात आला होता.

तालुक्यातील कोतवडे येथील दिलीप रामाणे याच्या खूनाची ९ महिन्यानंतर उकल करण्यात अखेर ग्रामीण पोलिसांना यश आले, दिलीप हा दारूसाठी काजूच्या बिया चोरत असल्याने या रागातून खून करण्यात आला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून बुधवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नानू भोसले (४०,रा कोतवडे रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे, त्यानेच दिलीप रामाणे याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा संशय पोलिसांना आहे.

अद्याप पोलिसांकडून खूनाचा प्राथमिक तपास करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दिलीप रामचंद्र रामाणे (५८, रा कोतवडे, लावगणवाडी) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे. दिलीप यांचा रक्ताने माखलेल्या स्थितीतील मृतदेह १७ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास  कोतवडे कुंभारवाडी परिसरात आढळून आल्यानंतर कोतवडे गावात खळबळ उडाली होती. दिलीप याचा खून नेमका कुणी केला याबाबत उलटसुलट चर्चाना उधाण आले होते. दिलीप याचा कुणाशी वाद नसल्यानें या खूनाची काही केल्या उकल होत नव्हती.

१०० जणांचा जबाब – पोलिसांकडून सुमारे १०० हून रांची जबाब नोंदविण्यात आला होता. तसेच दिलीप ज्या ठीकाणी दारू पिण्यासाठी जात असे तेथील सर्वांची चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात आली होती.

काजू बिया ठरले खूनाचे कारण – दिलीप रामाणे याला दारू पिण्याचे व्यसन होते. दिलीप हा दारू पिण्यासाठी आपल्या बागेतील काजूच्या बिया चोरतो असा संशय आरोपी नानू भोसले याला होता. याच रागातून नानू याने दिलीप रामाणे याचा काटा काढला असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular