27.1 C
Ratnagiri
Thursday, November 14, 2024

मुंबईत जोरदार राडा, तुफान दगडफेक शिंदे X ठाकरेंचे शिवसैनिक भिडले !

निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच मुंबईत मंगळवारी रात्री...

परशुराम घाटातील वाहतूक धोक्याचीच…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना परशुराम घाट...
HomeRatnagiriअखेर आज शाळेची पहिली घंटा खणखणली

अखेर आज शाळेची पहिली घंटा खणखणली

तब्बल दीड वर्षानंतर आज राज्यातील  शाळा सुरू झाल्या असून, ग्रामीण भागासह मुंबईतल्या शाळाही सुरु झाल्या आहेत.

कोरोनामुळे  मागील दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या राज्यातील शाळा आज सोमवार दि. ४  ऑक्टोबरला सुरू झाल्या आहेत. या निमित्ताने दुपारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार असून, विद्यार्थ्यांना देखील हा कार्यक्रम दाखविण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत. आज शाळेच्या पहिल्या दिवशी मुलावर दडपण न येता, शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे.

कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार आज सोमवार, दि. ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २ हजार ९० शाळा सुरू होणार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

तब्बल दीड वर्षानंतर आज राज्यातील  शाळा सुरू झाल्या असून, ग्रामीण भागासह मुंबईतल्या शाळाही सुरु झाल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच स्वागत केलं. सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला आज सकाळी भेट दिली.  शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. एवढ्या महिन्यानंतर शाळा सुरु झाल्याने, त्यांच्या मनात शाळेत प्रत्यक्ष आल्यावर कसे वाटते आहे ! शाळेच्या पहिल्या दिवसाच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. राज्यभरातील शाळांमध्ये शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत,  यावर शाळा व्यवस्थापन कमिटी सातत्याने लक्ष ठेऊन आहे.

RELATED ARTICLES

Most Popular