22.7 C
Ratnagiri
Saturday, December 21, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeSindhudurgघरात सुरू होती अघोरी पुजा; ८ फूट खड्डा खोदून नरबळीची तयारी…

घरात सुरू होती अघोरी पुजा; ८ फूट खड्डा खोदून नरबळीची तयारी…

घरात सुमारे ४ बाय ४ बाय ८ लांबी-रुंदी आणि खोलीचा खड्डा खणलेला आढळला.

कुडाळ तालुक्यातील हिर्लोक आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गृहदोष दूर करण्यासाठी ही अघोरी पूजा होत असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. या ठिकाणी नरबळी दिला जात होता का? असा संशय असून त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता ४ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.. याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिर्लोक आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव या व्यक्तीच्या राहत्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली असून घरात कोणतीतरी जादुटोणा करणारी अघोरी कृती चालल्याचा दाट संशय आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी हिर्लोक-आंबेडकरवाडी येथे विशाल विजय जाधव याच्या राहते घरात जाऊन खातरजमा केली.

त्यावेळी घरात सुमारे ४ बाय ४ बाय ८ लांबी-रुंदी आणि खोलीचा खड्डा खणलेला आढळला. अनिष्ट प्रथेचा वापर करुन जादूटोणा करणारे साहीत्य सुद्धा आढळून आँले. यामध्ये लिंबू, पान सुपारीचे विडे, हळद, पिंजर, नारळ, फळे, फुले, तिळ, बर्फीचे पुडे, पणत्या, अबीर, डमरु, रुद्राक्ष माळ, चामड्याचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोट्या काठ्या, कांबळी घोंगड्याचे तुकडे, वे कवडे, बिब्बे अशा साहित्याची मांडणी करुन नरबळी अगर अन्य कोणत्या तरी अघोरी कृतीकरीता कोयता आणि सूट्टी अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली. आवळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना हि हकीगत कळवली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, प्रितम कदम, अनिल पाटील, महीला पोलीस ज्योती रायशिरोडकर यांनी घटनास्थळी जाऊन वस्तूस्थितीची खात्री केली.

त्यावेळी घरात असलेले संशयित आरोपीत क्र. १ विशाल विजय जाधव (वय ३० वर्षे, रा. घर नं. ३५३, हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग सद्या रा रु.नं. १, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे (पश्चिम)), संशयित आरोपीत क्र. २. सुस्मित मिलींद गमरे (वय ३३ वर्षे रा. मु.पो. पातेपिलवली, धर्मवीर नगर, साईनिवास सोसायटी, विनं ९, रु.नं. ७०९, ता. चिपळूण जि. रत्नागिरी), आरोपीत क्र. ३ हर्षाली विशाल जाधव पुर्वाश्रमीची समृध्दी अविनाश हडकर, (वय ३५ वर्षे रा. हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सद्या रा. रुनं ।, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे पश्चिम) आरोपीत क्र. ४ अविनाश मुकुंद संते वय ३२ वर्षे रा. उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे) व आरोपीत. क्र. ५ दिनेश बालाराम पाटील (वय ३४ वर्षे रा उसरघ्ररगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पुर्व), जि. ठाणे) हे मिळून आले.

त्यांचेकडे एवढा मोठा खड्डा खोदण्याचे कारण विचारले असता विशाल जाधव याचे घरास गृहदोष असल्याने तसेच त्याचे पत्नीस मुलबाळ होत नसल्याने त्यांची पिडा दूर करण्यासाठी सदरची अघोरी पूजा केल्याचे सांगितलेले आहे. परंतु ते समाधानकारक माहीती देत ‘नाहीत, गुन्हयाचे सखोल अन्वेषणाकरीता नमुद सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींनी घटनास्थळी येण्या जाण्याकरीता वापरलेली इको कार जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी सदरबाबत फिर्याद दिलेली आहे. अधिक तपास स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत. दरम्यान काही वर्षांपूर्वी झालेले मालवण तालुक्यातील नांदोस हत्याकांड ताजे असतानाही जिल्ह्यात अशा प्रकारे परजिल्ह्यातन आलेल्या तंत्र मंत्र, जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा वावर वाढत आहे. शहरातील शिकली सवरलेली माणसे देखील अशा अंधश्रद्धांना बळी पडत आहेत अशी चर्चा होत आहे. दरम्यान संशयीत ५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular