जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी आंदोलन समृद्ध कोकण संघटनेच्या शेतकरी मच्छीमार व पर्यटन उद्योजक यांच्यासाठी आंदोलनाला कोकणातील सर्व सामान्य नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जाकादेवी येथे आयोजित केलेल्या शेतकरी बैठकीला आणि आंदोलनाला १०० हून अधिक शेतकरी उपस्थित राहिले. संपूर्ण कोकणात हे आंदोलन चालणार आहे. काजू बीला हमीभाव, माकडांचे व वन्य प्राणी यांचें नियंत्रण, आंबा बागायतदार मच्छीमार संपुर्ण कर्जमाफी, पर्यटन, शेती आणि मासेमारी रोजगार देणाऱ्या विषयांसाठी दरवर्षी बजेटमध्ये प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांची तरतूद, सुपारी आणि काजू ‘बीला हमीभाव, आश्वासने बंद करून कोकण हायवे पूर्ण करणे अशा मागण्या घेऊन संपूर्ण कोकणात हे आंदोलन समृद्ध कोकण संघटनेने सुरू केले आहे.
राजापूर मधील भू या गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाला पहिले छोटेसे यश मिळाले आहे. २०१५ मध्ये कोकणातील शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन करून व्याजमाफी केली होती ती आजपर्यंत दिली नाही पण आता काही शेतकऱ्यांना व्याजमाफी प्रत्यक्ष मिळाली. ज्यांचे ज्यांचे कर्ज पुनर्गठन केले होते त्या सर्वांना विनाअट व्याजमाफी मिळाली पाहिजे. ठराविक लोकांना मिळणं पुरेसं नाही. त्यापुढे जाऊन कोकणातील आंबा बागायतदारांनी आजपर्यंत कधीच कर्जमाफी मिळाली नाही पण एकदा कोकणातल्या आंबा बागायतरांची कर्जमाफी व्हायला हवी ही आमची प्रमुख मागणी आहे. याशिवाय विम्याचे पैसे अजून मिळाले नाहीत ते मिळाले पाहिजेत, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे.
समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव सरचिटणीस संदीप शिरधंनकर, उपाध्यक्ष ‘युयुत्सूं आरते सचिव अनिश निमकर शेतकरी’ संघटनेचे प्रमुख बावाशेठ साळवी, अजय कोळंबेकर, स्थानिक संयोजक दीपक उपळेकर, विनय मुकादम, मन्सूर काजी, आणि शंभरहून अधिक स्थानिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. याच मागण्या घेऊन १९ सप्टेंबर रोजी संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली हजारो कोकणवासीय शेतक्री मच्छिमार पर्यटन व्यवसायिक आमरण उपोषण सुरू करत आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या मागण्या मान्य होऊन याचे जीआर निघाले पाहिजे तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरू राहील असा निर्धार समृद्ध कोकण चे प्रमुख संजय यादवराव यांनी व्यक्त केला आहे.