21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeChiplunन्यू मांडवे येथील धरणग्रस्तांचे आंदोलन

न्यू मांडवे येथील धरणग्रस्तांचे आंदोलन

सद्यःस्थितीत धरणाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम रखडले आहे.

तालुक्यातील न्यू मांडवे धरणाचे काम २८ वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. लघुपाटबंधारे खात्याकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच्या निषेधार्थ न्यू मांडवे येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत भरणे येथील लघुपाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तळे विभागात येणाऱ्या न्यू मांडवे धरणअंतर्गत घोगरे, दहिवली, किंजळेतर्फे नातू व शिंगरी येथील जमीन संपादनास १९८३ मध्ये शासकीय मान्यता मिळाल्यानंतर १९९३ मध्ये धरणकामाचे भूमिपूजन झाले. सद्यःस्थितीत धरणाचे काम ६० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम रखडले आहे.

गेल्या २८ वर्षांपासून रखडलेल्या धरणाच्या कामाला गती देण्यासाठी ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावाही करत आहेत; मात्र अधिकाऱ्यांकडून केवळ कागदावरच रंगवली जात असल्याचा सूर आळवण्यात येत आहे. धरणाच्या कामासाठी जेसीबी व पोकलेनसारखी यंत्रणा आणून माती इकडे तिकडे करण्यापलीकडे काहीच केले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. धरणाचे काम रखडले असूनही वीजनिर्मितीचाही प्रकल्प येऊ घातला आहे.

या प्रकल्पास कुठलाही विरोध नाही; मात्र धरण अपूर्णावस्थेत असतानाही प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च कशासाठी, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. २०१४ च्या शासन अध्यादेशानुसार, धरणग्रस्त शेतकऱ्यांना रक्कम मिळावी व ३६ धरणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत लघुपाटबंधारे कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन छेडले. धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी ठोस पावले न उचलल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular