33.2 C
Ratnagiri
Thursday, February 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeChiplunरत्नागिरी तटरक्षक दल 'वालावलकर'मध्ये करार

रत्नागिरी तटरक्षक दल ‘वालावलकर’मध्ये करार

रत्नागिरी हे तटरक्षक दलाचे एक मोठे तळ तयार होत आहे.

भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी आणि डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल यांच्यामध्ये आज तटरक्षक दलाच्या जवानांना माफक सवलत दरात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याबाबत चिपळूण येथे सामंजस्य करार झाला. देशाच्या संपूर्ण पश्चिम क्षेत्रातील तटरक्षक दलाशी करार करणारे हे पहिले रुग्णालय ठरले आहे. भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरी जे कोकणातील तटरक्षक दलाचे एक प्रमुख कार्यालय आहे. त्याचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यापर्यंत पसरलेले आहे. वालावलकर हॉस्पिटल हे संपूर्ण कोकणात नावाजलेले, अद्ययावत व सुसज्ज असे चिकित्सा केंद्र आहे.

या सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या सर्व कार्यरत सैनिक, असैनिक कर्मचारी, सेवानिवृत्त सैनिक व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना सर्व वैद्यकीय उपचाराबरोबरच आपत्कालीन आणि तज्ञ चिकित्सादेखील केंद्र सरकारच्या स्वास्थ्य योजनेतून अत्यल्प दराने प्राप्त होणार आहे. तटरक्षक दलातर्फे रत्नागिरीचे स्टेशन कमांडर उपमहानिरीक्षक शत्रूजित सिंह आणि वालावलकर हॉस्पिटलतर्फे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुवर्णा पाटील यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी तटरक्षक दलाचे स्टेशन वैद्यकीय अधिकारी सर्जन लेफ्टनंट कमांडर गोपन जीजे आणि वालावलकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी डॉ. असावरी मोडक उपस्थित होते.

रत्नागिरी हे तटरक्षक दलाचे एक मोठे तळ तयार होत आहे. आजतागायत सुमारे ७०० सैनिक व कर्मचाऱ्यांची मान्यता केंद्र सरकारने दिली आहे. जसजशी तटरक्षक दलाची विविध कार्यालाये आणि आस्थापणे रत्नागिरी येथे तयार होतील तसे हे मनुष्यबळ आणखी वाढणार आहे. या मनुष्यबळास आणि त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र नियमांनुसार सर्व सरकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास तटरक्षक दल प्राधान्य देत आहे. या कराराच्या अनुषंगाने उपमहानिरीक्षक शत्रूजीत सिंह यांनी जिल्ह्यातील तटरक्षक दलाच्या सर्व आजी-माजी सैनिक आणि असैनिक कर्मचऱ्यांना या आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular