27.8 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeMaharashtraउच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार

उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची माहिती दिली आहे. राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त कौशल्य आधारित शिक्षण मिळावे त्याचप्रमाणे, त्यांची रोजगारक्षमता वाढावी याकरिता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जगप्रसिद्ध इन्फोसिस  या कंपनीसोबत हा सामंजस्य करार केला आहे.

इन्फोसिस प्रथमच अशा प्रकारचा करार करत आहे. हा करार जवळपास ४० लाख विद्यार्थी आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना फायदेशीर ठरणार आहे. हे शिक्षण इन्फोसिसकडून पूर्णपणे मोफत दिले जाणार असून, याचा राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्यासाठी इन्फोसिसच्या म्हैसूर येथील इन्स्टिटय़ूटमध्ये संबंधित प्राध्यापक, अधिकारी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात येणार असल्याचे नाम. सामंत यांनी सांगितले.

इन्फोसिसच्या सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे एकूण  ३,९०० हून अधिक ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केले असून ते कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क त्यांच्या अभ्यासक्रमासोबत उपलब्ध असणार आहेत. एक पथदर्शी प्रकल्प म्हणून रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालय, नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत १० लाख विद्यार्थ्यांना आणि उच्चशिक्षण संचालनालयाअंतर्गत ३० लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना या कराराचा फायदा होणार आहे. इन्फोसिस स्प्रिंग बोर्डचे ३,९०० हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular