27.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKokanमाकडे, वन्यप्राण्यांमुळे कोकणातील शेती उद्ध्वस्त

माकडे, वन्यप्राण्यांमुळे कोकणातील शेती उद्ध्वस्त

नियमावलीचे पालन होण्यासाठी कडक कायद्यांचे निर्बंध आणावेत.

माकडे व अन्य वन्यप्राण्यांमुळे कोकणातील शेती उद्ध्वस्त होत आहे. याबाबत उपाय योजना करणे गरजेचे आहे. काजू बी, सुपारीला हमीभाव, आंबा बागायतदार आणि मच्छीमारांना कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी लोकचळवळ उभारली आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, अशी माहिती समृद्ध कोकण लोकचळवळीचे मुख्य समन्वयक संजय यादवराव यांनी दिली. श्री. यादवराव म्हणाले, माकडे व अन्य वन्यप्राण्यांमुळे कोकणातील शेती उद्ध्वस्त होत आहे. याबाबत उपाययोजना करावी.

काजू बीला १५० रुपये हमीभाव मिळावा, सुपारीलाही हमीभाव द्यावा, गेली १० वर्षे अडचणीत असलेल्या कोकणातील आंबा बागायतदारांना १०० टक्के कर्जमाफी, व्याजमाफी व नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे प्रोत्साहनपर ५० हजार द्यावे. फळपीक विमा योजनेच्या निकषात बदल करावेत. अडचणीतील मच्छीमारांना कर्जमाफी व छोट्या मच्छीमारांना नवीन तंत्रज्ञान व नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे. एलईडी मासेमारी पूर्णपणे बंद करावी. नियमावलीचे पालन होण्यासाठी कडक कायद्यांचे निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात येणार आहे.

कोकणासाठी पर्यावरणपूरक उद्योग उभे रहावेत यासाठी टुरिझम पार्क, आयटी पार्क, फिशरीज पार्क, एज्युकेशन हब, ऑटोमोबाईल पार्क, इंजिनियरींग उद्योग, इनोव्हेशन पार्क, जलवाहतूक या स्वरूपाचे उपक्रम राबवणारे स्वायत्त संस्था कोकण विकास प्राधिकरणाची अमंलबजावणी त्वरित व्हावी. यासारख्या १५ मागण्यांसाठी लोकचळवळीच्या माध्यमातून लढा उभारण्यात येणार असल्याचे यादवराव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular