24.4 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeRatnagiriवेषांतर करून पोलिसांनी रत्नागिरीतून कुख्यात गुंडाला घेतले ताब्यात

वेषांतर करून पोलिसांनी रत्नागिरीतून कुख्यात गुंडाला घेतले ताब्यात

पोलिसांनी त्यास रत्नागिरी तालुक्यातील पावस नजिकच्या चांदोर येथील एका चिरेखाणी वरून ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रत्नागिरी मध्ये येऊन एक मोठी कामगिरी केली आहे. अनेक काळ मागावर असलेल्या कुविख्यात गुंड संदीप उर्फ संदीप्या ईश्वर भोसले याला अटक केली आहे. त्याच्यावर राज्यातील विविध पोलीस स्थानकात मोक्कासह तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी खाण कामगार, ट्रॅक्टर चालक म्हणून तब्बल तीन दिवस खाणीवर काम करत होते.

पोलीस गुन्हेगाराला पकडण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवत असतात. या गुंडाला पकडण्यासाठी त्यांनी वेषांतर केले होते आणि हा प्लॅन यशस्वी झाला आणि हा गुंड ताब्यात मिळाला. पोलिसांनी त्यास रत्नागिरी तालुक्यातील पावस नजिकच्या चांदोर येथील एका चिरेखाणी वरून ताब्यात घेतले आहे. संदीप भोसले हा विजय नारायण भोसले रा. वाहिरा, बीड या नावाने परिसरात वावर होता. गेले अनेक दिवस संदीपने चांदोर येथे वास्तव्याला असल्याने, त्याने या भागामध्ये काही चोरीचे गुन्हे केले आहेत का? याचा  तपास सूरु करण्यात आला आहे आणि लवकरच अनेक गुन्ह्यांचा होणार आहे.

राज्यभरात गुन्हे करुन मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल झाल्याने संदीपने अखेर वास्तव्यासाठी रत्नागिरीचा का आसरा घेतला, याबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. संदीप भोसले याने आपल्या साथिदारांसह दि. ११ जून २०१९ रोजी भर दुपारी पारनेर येथील एका वृद्ध व्यक्तीच्या घरावर दरोडा टाकून सोन्याचा ऐवज लंपास केला होता. त्या गुन्ह्यात संदीप अन्य आरोपींचा समावेश होता.

त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, वयाच्या २३ व्या वर्षी त्याच्या ६ पत्नी असून, २५ मुले आणि मुली असा मोठा विस्तारलेला परिवार आहे. संदीप भोसले हा सराईत गुन्हेगार असून पुणे, बीड, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद या ठिकाणी चोऱ्या, दरोडे, घरफोड्या, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जने असे अनेक गुन्हे आहेत. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे बाहेर पडणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular