26.4 C
Ratnagiri
Thursday, November 7, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeMaharashtraसंजय राऊत आणि किरीट सोमय्यांचे आरोप प्रत्यारोप सुरूच

संजय राऊत आणि किरीट सोमय्यांचे आरोप प्रत्यारोप सुरूच

आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर युद्धाचे स्मारक बनवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्यांकडून तब्बल ५६ कोटींचा निधी गोळा केला. परंतु, या निधीचे नंतर काय झाले हे सोमाय्याच सांगतील.

खासदार संजय राऊत यांची मालमत्ता पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणात ईडीने जप्त करताच, राऊत किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर युद्धाचे स्मारक बनवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्यांकडून तब्बल ५६ कोटींचा निधी गोळा केला. परंतु, या निधीचे नंतर काय झाले हे सोमाय्याच सांगतील. राज्य सरकारकडे त्यांनी जमा केलेला कोटीतील निधी सोपवलेलाच नाही, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, याप्रकरणी राज्य सरकार नक्कीच चौकशी करेल, असेही त्यांनी काल सांगितले होते. त्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांविरोधात आज मुंबईतील निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज थेट असा इशारा दिला आहे कि, आयएनएस विक्रांतच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून ५६ कोटी गोळा करून जनतेला फसवणाऱ्या किरीट सोमय्या व त्यांच्या मुलाला जेलमध्ये जावेच लागणार. माझे वाक्य नोंद करून ठेवा. किरीट सोमय्या हा महाराष्ट्रद्रोही तर होताच. पण, देशद्रोही असल्याचे उघड होणार आहे. त्यामुळे लोकांनी आता गप्प बसू नये. जवानांचे शोषण करणाऱ्या भाजपला जाब विचारण्याची हीच वेळ आहे,  असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

आज राज्यसभेत गुन्हे प्रक्रिया कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी कायद्याच्या गैरवापराबद्दल आसूड ओढले. नव्या कायद्याचा गैरवापर होणार नाही असे गृहमंत्री म्हणत आहेत तर मग सध्या देशामध्ये जे सुरु आहे त्याला काय म्हणावे !, असा सवाल त्यांनी केला. १०२ वर्षांपूर्वींचा कायदा बदलला जातोय. मन स्वच्छ असेल तर विरोध करण्याचे कारण नाही. पण गुन्हेगार कोण आहे?  जो तुम्हाला प्रश्न विचारणार तो गुन्हेगार बनतो, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच, गुन्हे प्रक्रिया कायद्यामध्ये होणारे बदल चांगले आहे. मात्र, या कायद्याचा गैरवापर होणार नाही. हे तुम्ही आमच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकाल काय, असा थेट सवालही संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. केंद्र आणि राज्याविरुद्धचा संघर्ष पेटलेला असतानाच यानिमित्ताने मुंबईत शिवसेनेतर्फे आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular