26.3 C
Ratnagiri
Tuesday, April 22, 2025

खराब तापमानामुळे सागरी मासेमारीवर परिणाम

सर्वसाधारणपणे गुढीपाडवा झाला की समुद्रात नव्याने मासळी...

शेकाप नेत्याच्या दोन मुलांसह भाच्याचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचे...

रत्नागिरीत खेडशी परिसरात उपयुक्त पाळीव प्राणी मुंडकं छाटलेल्या स्थितीत सापडल्याने संताप

रत्नागिरी तालुक्यात रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर खेडशी...
HomeChiplunचिपळूण महापुराचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा अजितदादांचा शब्द

चिपळूण महापुराचा प्रश्न कायमचा सोडवण्याचा अजितदादांचा शब्द

कोल्हापूर एअरपोर्टला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावेळी उर्वरित गाळ काढण्याकरता निधी मिळावा, यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम प्रयत्न करत आहे.

कोल्हापूर विमानतळावरून मुंबईकडे येण्यासाठी निघालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोकणातील चिपळूण येथील माजी नगरसेविका महिलांची काही मिनिटे भेट झाली. या काही मिनिटांच्या भेटीत कोकणातील चिपळूण शहराचा महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून अजित दादांनी मोठा शब्द दिला आहे. पाऊस संपला की तात्काळ निधी व यंत्रसामुग्री देतो आहे. काळजी करू नका, असे आश्वासन देत या मित्र-मैत्रिणी ग्रुपची त्यांनी आवर्जून चौकशीही केली. मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान तिरुपती येथे जात असताना कोल्हापूर एअरपोर्टला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावेळी उर्वरित गाळ काढण्याकरता निधी मिळावा, यासाठी चिपळूणचे आमदार शेखर निकम प्रयत्न करत आहे.

त्यांना आणि आम्हा चिपळूणवासियांना सर्वतोपरी मदत करा, अशी विनंती या महिलांनी अजित दादांना एअरपोर्टवरच केली. त्यावेळी त्यांनी पाऊस संपल्यावर लगेच निधी आणि आवश्यक यंत्र सामुग्री देतो, असे आश्वासन दिले आहे. क्षणाचाही विलंब न लावता कोकणातील सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूणसाठी हे आश्वासन महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासकीय कामकाजात नेहमीच चर्चेत राहिलेले अजित पवार यांनी आम्हाला मोठा शब्द देऊन धीर दिला. अजितदादांच्या या कार्यपद्धतीवर चिपळूण येथील मित्र-मैत्रिणी ग्रुपही खुश झाला व अजित दादांचे त्यांनी धन्यवाद मानले व हा ग्रुप पुढे श्री तिरुपतीच्या दर्शनासाठी एअरपोर्टवरून रवाना झाला. यावेळी चिपळूण येथील मित्र मैत्रिणी ग्रुप तर्फे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व आमदार शेखर निकम यांचे आभार मानण्यात आले.

परखड व स्पष्ट मत व्यक्त करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा हे कार्यपद्धती व स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या व्यस्त वेळात काही मिनिटांची झालेली ही एअरपोर्टची भेट यावेळी अजित दादांनी आम्हाला दिलेला शब्द हा आमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे नक्कीच चिपळूण कायमचे पुर मुक्त होईल, असा विश्वास चिपळूण येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या माजी नगरसेविका अदिती देशपांडे यांनी व्यक्त केला. चिपळूण येथील मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये यावेळी माजी नगरसेविका अदिती देशपांडे यांच्या समवेत डॉ. विकास जोगळेकर, मंजुषा जोगळेकर, प्रकाश कदम अजय देशपांडे, माया कदम, सनी भाटिया व आरोही भाटिया उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular