26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeMaharashtraआता १० गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा - तुकडाबंदी कायदा

आता १० गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा – तुकडाबंदी कायदा

ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे.

राज्यातील शेतकरी आणि जमीन खरेदी-विक्री करणा-यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात लवकरच तुकडाबंदी कायद्यात शिथिलता आणली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात १० गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा होणार आहे. जमीन खरेदी-विक्रीतल्या किचकट नियमांमुळे जमीनमालक आणि खरेदीदारासमोर येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. महसूल विभागानं तुकडाबंदी कायद्यात अंशत: फेरबदल करून नवी अधिसूनचा जारी केली आहे. त्यानुसार २० गुंठे जिरायती आणि
१० गुंठे बागायती जमिनीच्या खरेदी आता १० गुंठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

तुकडाबंदी कायद्यामुळं गुंठेवारीवर जमीन विक्री तसंच खरेदीची दस्त नोंदणी करता येत नव्हती. अलिकडच्या काळात कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्यानं जमीन धारणा क्षेत्र बदललंय. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मालकी हक्क मिळणं गरजेचं आहे. त्यामुळेच महसूल विभागानं तुकडाबंदी कायद्याबाबत मोठा बदल केला आहे. राज्य शासनाने २०१५ मध्ये तुकडाबंदी कायदा लागू केला होता. त्यामुळे अनेकांना २० गुंठ्यापेक्षा कमी शेतजमीन खरेदी करता येत नव्हती. गुंठेवारीबाबतच्या या धोरणात्मक निर्णयामुळे ग्रामीण भागातल्या जनतेला निश्चितच दिलासा मिळेल अशी आशा करायला हरकत नाही. केवळ ग्रामीण भागातील जिरायती आणि बागायती क्षेत्राचा यात समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील जिल्हानिहाय जिरायती आणि बागायती गुंठेवारीचे क्षेत्र हे वेगवेगळे असून महापालिका, नगर परिषदा, नगर पालिका हद्दीत असलेलं क्षेत्र वगळण्यात आलं आहे. महसूल विभागाने शेतजमिनीच्या बाबतीत एक, दोन, तीन गुंठ्याचा प्रस्ताव मान्य केलेला नाही. मात्र १० गुंठ्यापर्यंतच्या जमिनीच्या खरेदी- विक्रीला परवानगी देऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या इतकी कमी गुंठे जमीन खरेदी करायची असल्यास जमिनीचा एन.ए लेआऊट बंधनकारक आहे. मात्र ही प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. शासनानं एक, दोन आणि तीन गुंठे जमीन खरेदी- विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी होत होती.

RELATED ARTICLES

Most Popular