22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeMaharashtraअक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर ११ हजार आंब्यांची आरास

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवर ११ हजार आंब्यांची आरास

पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अक्षयतृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला.

आज अक्षयतृतीयेनिमित्त रत्नागिरी व पुण्यातील आंब्याचे प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांचेतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पांच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. हे आंबे उद्या ससून रुग्णालयातील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्ध आश्रम, दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत. भाविकांनी आज सकाळपासूनच आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी गर्दी केली होती. अतिशय डोळे भरणारी आंब्यांची आरास पाहता सर्वजण आंबामय झाले.

सकाळी ८ ते १२ गणेश याग,  दुपारी १२.३६ ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री ९ वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम खास आंबा महोत्सवानिमित्त मंदिरामध्ये पहाटे ४ ते ६ वाजता सादर करण्यात आला.

आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अक्षयतृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची आरास करण्यासाठी वापरण्यात आलेले आंबे उद्या ससून रुग्णालयातील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहेत. दुपारी १२.३६ ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा संपन्न झाला. संपूर्ण मंदिर परिसरामध्ये हापूस आंब्यांचा दरवळ पसरला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular