25.6 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

राजापूर पोस्टातील रेल्वे आरक्षण पुन्हा सुरू…

काही तांत्रिक बिघाडामुळे गेल्या आठवडाभरापासून राजापूर पोस्ट...

सुनावणीपूर्वीच फेरसर्वेक्षणाला विरोध – शिवसेना ठाकरे गट

चिपळूण पालिकेने वाढीव घरपट्टीबाबत २८ सप्टेंबरपर्यंत हरकती...

ना. नितेश राणेंना मत्स्योद्योग तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालय

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच शनिवारी रात्री...
HomeRatnagiriचालक-वाहकांची घेणार अल्कोहोल चाचणी प्रशासनाचा निर्णय

चालक-वाहकांची घेणार अल्कोहोल चाचणी प्रशासनाचा निर्णय

पघात रोखण्यासाठी चालक व वाहकांची अल्कोहोल चाचणी.

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची वाढती संख्या लक्षात घेत एसटी महामंडळाने जिल्ह्यात आतापर्यंत ३२०० जादा बसेसची व्यवस्था केली आहे. अपघात रोखण्यासाठी चालक व वाहकांची अल्कोहोल चाचणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ६ अपघातप्रवण क्षेत्रात एसटी प्रशासनाचे पथक तैनात करण्यात येणार आहे. चोरीच्या घटना टाळण्यासाठी बसस्थानकातही पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यंदा १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी येतात.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या ३१० गणपती स्पेशलच्या फेऱ्यांचे आरक्षणही हाउसफुल्लच झाल्याने आणखी गणपती स्पेशल गाड्या चालवण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीवरील चाकरमान्यांची पावले एसटी बसकडे वळली आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी यापूर्वी १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान ३१०० जादा बसेस चालवण्याचे नियोजन केले होते. त्यातील १७०० बसेस आरक्षितही झाल्या असून, हा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. चाकरमान्यांच्या वाढत्या मागणीनुसार, आणखी १०० जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, जादा गाड्यांची संख्या ३२०० वर पोहचली आहे.

गणेशोत्सव कालावधीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची काळजी घेण्यावर पोलिस प्रशासनासह एसटी महामंडळाने आतापासूनच भर दिला आहे. शासकीय सुटीला जोडून १६ व १७ ला शनिवार व रविवार असल्याने गणेशोत्सवासाठी विविध भागांतून गावी येणाऱ्या चाकरमान्यांमुळे महामार्गावर वाहतूककोंडी होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular