25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriअवैध धंदे कायमचे बंद करणार, तीन महिन्यांत ४८४ गुन्हे

अवैध धंदे कायमचे बंद करणार, तीन महिन्यांत ४८४ गुन्हे

कारवाईत २ कोटी २५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध दारूधंद्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली आहे. ३ महिन्यात ४८४ गुन्हे दाखल करून ३९५ संशयितांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या कारवाईत २ कोटी २५ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध धंदे कायमचे बंद व्हावेत, यासाठी एमपीडीए अॅक्टनुसार कारवाई यापुढे केली जाणार असल्याची माहिती अधीक्षक सागर धोमकर यांनी दिली. जिल्ह्यात ३५ हातभट्टीची ठिकाणे असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात अवैध दारूधंदे आणि गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई हाती घेतली.

जिल्ह्यात उत्पादन शुल्कने तीन महिन्यात ४८४ गुन्हे दाखल करून ३९५ विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत २ कोटी २५ लाख, ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ८ वाहनांचीदेखील समावेश आहे. जिल्ह्यात ३५ हातभट्टीची ठिकाणे असल्याची माहिती अधीक्षक धोमकर यांनी दिली. सर्वाधिक ठिकाणे रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आदी ठिकाणी असून १४ ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात यश आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. तसेच एकूण साठजणांकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular