26.7 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeKhedआंबेत पूल अचानक वाहतुकीसाठी बंद केल्याने वातावरण तापले

आंबेत पूल अचानक वाहतुकीसाठी बंद केल्याने वातावरण तापले

पुलावरील वाहतुकीस पर्याय देण्यापूर्वीच सर्व प्रकाराची वाहतूक बंद करण्यात आल्याने काही काळ वातावरण चांगलेच तापले.

रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आंबेत पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. काल दुपारी खासदार सुनील तटकरे यांच्याबरोबर प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्या नंतर तटकरे यांनी पूल बंद करणार असल्याची घोषणा केली.

अचानक आंबेत पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केल्याने स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर बंदोबस्ताकरिता पोलिसांना पाचारण करावे लागल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.

दुपारी साडेबाराच्या दरम्यान हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अचानक बंद करण्यात आला. पण सकाळी म्हाप्रळ येथील विद्यार्थी व नागरिक आपापल्या कामांकरिता पलीकडे गेले होते. सर्व प्रकारची वाहतूक बंद करत असल्याची कोणतीच पूर्वसूचना न दिल्याने तसेच एक मार्ग बंद केला तर, त्याला पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते, परंतु, पर्यायी वाहतूक व्यवस्था देखील न करता पूल बंद झाल्याने स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना  पाचारण करण्यात आले.

पुलावरील वाहतुकीस पर्याय देण्यापूर्वीच सर्व प्रकाराची वाहतूक बंद करण्यात आल्याने काही काळ वातावरण चांगलेच तापले. नागरिकांची वाहतुकीची पर्यायी व्यवस्था कशा प्रकारे करण्यात येणार या संदर्भात काहीच कल्पना सार्वजनिक बांधकाम विभाग वा संबंधित अन्य यंत्रणांनी दिलेली नाही.

त्यामुळे ११ कोटी रुपये खर्च करून दुरुस्त केलेला व दुरुस्तीनंतर काही दोष निर्माण झालेला निदर्शनास आल्याने म्हाप्रळ-आंबेत पूल सर्वच प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला. आठवडा भरापूर्वी जेंव्हा वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला होता तेंव्हा, त्याबाबतचा फलक पुलाच्या दोन्ही बाजूंना लावण्यात आला होता. परंतु अवजड वाहतूक वगळता सर्व प्रकारची सुरळीत वाहतूक या पुलावरून सुरू होती. आज अचानक कोणतीही कल्पना न देताच पूल बंद केल्याने स्थानिक नागरिक संतापले.

RELATED ARTICLES

Most Popular