24 C
Ratnagiri
Wednesday, March 26, 2025

निधी मिळूनही रखडला काजिर्डा घाट…

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा...

‘ते’ कंत्राटी शिक्षक मानधनाच्या प्रतीक्षेत – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील ४५४ कंत्राटी शिक्षकांना...

मंजूर एमआरआय मशीन अडकले कुठे ? सिव्हिल-वैद्यकीय महाविद्यालयात समन्वयाचा अभाव

जिल्हा शासकीय रुग्णालयाला कोट्यवधीचे अत्याधुनिक एमआरआय मशीन...
HomeSports'अमेरिकन' नेत्रावळकर आयपीएल लिलावात…

‘अमेरिकन’ नेत्रावळकर आयपीएल लिलावात…

अडीच महिने चालणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला मोठी सुट्टी घ्यावी लागेल.

मूळचा मुंबईकर परंतु आता अमेरिकास्थित असलेला आणि काही महिन्यांपूर्वी झालेली द्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा गाजवणारा सौरभ नेत्रावळकर आयपीएलच्या लिलिवात असणार आहे. त्याच्यासोबत इटलीचा वेगवान गोलंदाज थॉमस ड्राका यानेही नोंदणी केली चर्चेचा विषय ठरली आहे. आयपीएलचा महालिलाव रियाद येथे २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी १,५७४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. बेन स्ट्रोक्सने माघार घेतली आहे; परंतु आयपीएल कधीही न खेळलेला आणि आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ४२ वर्षीय जेम्स अँडरसन यानेही लिलावासाठी आपले नोंद नोंदवले आहे. अँडरसन आपला अखेरचा द्वेन्टी-२० सामना १० वर्षांपूर्वी खेळला होता. आयपीएल संघ मालकांनी आपापल्या संघात कायम ठेवलेले गतवेळचे कर्णधार रिषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांच्यासह आर. अश्विन आणि युझवेंद्र चहल हे खेळाडूही यंदा लिलावात असणार आहेत. या सर्वांनी आपली पायाभूत किंमत दोन कोटी ठेवली आहे.

मोहम्मद शमीही लिलावात – वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला आणि अजूनही लगेचच पुन्हा मैदानात येण्याबाबत अनिश्चित असलेला मोहम्मद शमी यानेही लिलावासाठी आपले नाव नोंदवले आहे. गुजरात संघातून त्याला रिलीज करण्यात आले. शमीनेही आपली पायाभूत किंमत दोन कोटी ठेवली आहे. आयपीएलमध्ये प्रभाव पाडलेले ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, मुकेश कुमार, आवेश खान, दीपक चहर यांनीही दोन कोटी हीच पायाभूतं किंमत ठेवली आहे.

सर्फराझ, पृथ्वीही लिलावात – गतवेळच्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या सर्फराझ खान याच्यासह पृथ्वी शॉ यांनीही लिलावासाठी नोंदणी केली आहे; मात्र ७५ लाख एवढीच पायाभूत किंमत ठेवली आहे. मुंबई क्रिकेट संघाने सध्या शिस्तभंग आणि वाढलेल्या वजनामुळे पृथ्वी शॉ याला रणजी संघातूनही वगळले आहे.

ड्राका पहिला इटालीयन – आयपीएलच्या लिलावात नोंदणी करणारा थॉमस ड्राका हा पहिला इटालीयन आहे. जून महिन्यात पदार्पण केल्यानंतर तो इटली संघातून चार आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळला आहे. अमिरातीमध्ये होणाऱ्या आयएलटी-२० लीगमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या एमआय एमिरेट्स संघाशी करारबद्ध झालेला आहे.

नेत्रावळकरला सुट्टी मिळणार? – भारताकडून १९ वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत खेळल्यानंतर क्रिकेटला जवळपास रामराम करून अमेरिकेत उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी तेथील नागरिक झालेला सौरभ नेत्रावळकर ओरॅकल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये संयुक्तपणे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अमेरिका संघातून खेळताना त्याला कंपनीतून विशेष सुट्टी घ्यावी लागली होती. आता आयपीएल संघात त्याच्यासाठी बोली लागली तर अडीच महिने चालणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्यासाठी त्याला मोठी सुट्टी घ्यावी लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular