25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeEntertainment'पुष्पा 2' चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटावर परिणाम!

‘पुष्पा 2’ चा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटावर परिणाम!

चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो हे पाहता तारिख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

आता एकावेळी किंवा एकाच दिवशी एक नाही तर त्यासोबत दोन किंवा तीन चित्रपट प्रदर्शित होणं ही गोष्ट नवीन नाही. आपण अनेकदा पाहतो की अनेक चित्रपट हे एकाच दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होतात. एकंदरीत याचा कमाईवर परिणाम होतो तरी देखील निर्माते ठरलेल्या दिवशीच चित्रपट प्रदर्शित करतात मग त्यादिवशी कितीही चित्रपट प्रदर्शित होऊ देत. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनविषयी समोर येत आहे. असं म्हटलं जात होतं की काहीही झालं तरी निर्माते चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख बदलणार नाही. मात्र, त्याच्या अगदी विरुद्ध माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत असलेला विकी कौशलचा ‘छावा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख आधीच 6 डिसेंबर ठरली असली तरी देखील आता ‘पुष्पा 2’ च्या प्रदर्शनाच्या तारखेमुळे हा निर्णय घेतला आहे. कारण त्यामुळे विकी कौशलच्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.

यंदाच्या वर्षी अनेक चित्रपट हे प्रदर्शित झाले आहेत. अजूनही चित्रपटांची ही रांग मोठी आहे. या दोन महिन्यात देखील अनेक चित्रपट हे प्रदर्शित होणार आहे. तर डिसेंबर महिन्यात अनेक बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दिवाळीच्या निमित्तानं ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया 3’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले आणि बॉक्स ऑफिसवर त्यांच्या कमाईवर त्याचा थोडा का होईना परिणाम झाल्याचे म्हटले जाते. आता ‘पुष्पा 2: द रूल’ आणि ‘छावा’ या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी बोलायचं झालं तर अल्लू अर्जुनचा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर विकी कौशलचा ‘छावा’ हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, मिड-डे च्या एका रिपोर्टनुसार, ‘छावा’ च्या निर्मात्यांनी या क्लॅशचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो हे पाहता तारिख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय या आधीची एखादी तारिख निवडून त्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता हे दोन्ही चित्रपट एकमेकांना बॉक्स ऑफिसवर क्लॅश होणार नाही याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular